==============================
=====================================
कुंडल | दि. १४ फेब्रुवारी २०२३
सहकारातील अनुभव जयंतराव पाटील यांनी दिला त्यामुळेच आज आम्ही सहकार सक्षमपणे चालवत आहोत असे प्रतिपादन आमदार अरुणअण्णा लाड यांनी केले.
ते राजारामबापू साखर कारखान्याच्या कुंडल गटातून मामासाहेब पवार सत्यविजय सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब पवार यांची संचालक पदी निवड झाल्याबद्दल कुंडल (ता पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्यावरती सत्कार घेतला होता तेव्हा बोलत होते. यावेळी रेठरे हरणाक्ष गटातून राजारामबापू कारखान्याच्या संचालक पदी दादासाहेब मोरे, सांगली जिल्हा माध्यमिक सेवकांची पतसंस्थेच्या संचालक पदी आर.बी. लाड, शिक्षक सेवक सोसायटीच्या संचालक पदी नितीन जाधव, पुणे विभागीय पतसंस्थेच्या सचिवपदी अरुण सावंत यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करणेत आले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना बाळासाहेब पवार म्हणाले, आम्हाला ही संधी दिल्याबद्दल क्रांती परिवाराचा आभारी तर आहेच शिवाय सहकार ग्रामीण भागाचा कणा असल्याने तो टिकवण्यासाठी आणि आमदार अरुणअण्णांच्या कुशल प्रशासनातील अनुभवाचे आम्हीही अनुकरण करू.
यावेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, दिलीप लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, नितीन नवले, दादासो पाटील, कार्यकारी संचालक सी.एस.गव्हाणे, रावसाहेब वाकळे, अर्जुन कुंभार, महारुद्र जंगम, गोविंद डुबल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल बाळासाहेब पवार यांचा सत्कार करताना आमदार अरुणअण्णा लाड, बाजूस किरण लाड, शरद लाड आदी.
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆