महिला उपासिकानी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे भारतीय बौद्ध महासभेचे सांगली जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर यांचे आवाहन...
➡️ *व्हिडीओ पहा*
👇
======================================
===================================
सांगली | दि. ०२ फेब्रुवारी २०२३
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्नी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त दि. ५ फेब्रुवारी २०२३ रोजी मालगाव ता. मिरज जि. सांगली या ठिकाणी सकाळी 10 ते 5 या वेळेत भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हा व बौद्ध समाज मालगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी राष्ट्रीय उपाध्यक्ष आयु. एस.के. भंडारे, महिला प्रशिक्षण विभाग प्रमुख आयु. नि. सुषमाताई पवार, केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख आयु. एस.एस. वानखडे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आयु. भिकाजी कांबळे, सांगली जिल्हाध्यक्ष आयु. रुपेश तामगावकर महिला उपाध्यक्ष सांगली आयु. नि. कमलताई खांडेकरव सर्व जिल्हा, तालुका कार्यकारिणी,सांगली जिल्ह्यातील सर्व श्रामणेर, बौद्धचार्य, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका व सर्व महिला उपासिका, समता सैनिक उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यामध्ये त्यागमूर्ती माता रमाई जीवन संघर्ष, बौद्ध धम्माची वैशिष्ट्ये, भारतीय संविधानाने स्त्रियांना दिलेले हक्क व अधिकार, धम्म चळवळीतील स्त्रियांचे योगदान या विषयावर मार्गदर्शन दिले जाणार आहे तरी या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर यांनी केले आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆