=====================================
=====================================
सांगली | दि 23 फेब्रुवारी 2023
सांगली व इतर जिल्हयात विक्रीसाठी आणलेला रु २०,४०,०००/- किमंतीचा १०२ किलो वजनाचा हिरवट काळपट रंगांचा उग्र वासाचा तयार गांजा व गुन्हयात वापरलेले दोन चार चाकी वाहन असा एकुण २८,९०,०००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या गुन्ह्यातील चौघांना अटक करण्यात आली आहे.
अदिल नासीर शहापुरे वय ३३ रा.कोल्हापूर रोड सांगली , सचिन बाबासो चव्हाण वय ३१ रा. कवठेपिरान ता. मिरज, जि.सांगली.मयुर सुभाष कोळी वय ३३ रा. शंभर फुटी रोड सांगली , मतीन रफिक पठाण वय ३१ रा. सांगली. अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ,
कवठेपिरान ते सर्वोदय कारखाना जाणाऱ्या रोडवर असलेल्या बाबासो चव्हाण यांचे शेता मध्ये काही इसम हे त्यांचे कडील गांजा अंमली पदार्थ विक्री करीता घेवून येणार असल्याचे पोकों आर्यन देशिंगकर यांना गुप्त बातमीदारामार्फत विश्वसनीय व खात्रीशीर बातमी मिळाली होती.
सपोनि संदीप शिंदे व त्यांचे पथकाने सदर ठिकाणी जावुन छुप्या पद्धतीने चालाखीने सापळा लावून पाहणी केली असता, सदर ठिकाणी दोन वाहने संशयास्पदरित्या उभे असलेले व सदर ठिकाणी ०४ इसम संशयीत हालचाली करीत असल्याचे दिसुन आले व सदर इसमांचा संशय आल्याने सपोनि संदीप शिंदे व त्यांचे पथकाने सर्व बाजुने पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने छापा मारला असता, सदर इसम पळुन जाण्याचे तयारीत असताना पोलीसांनी त्यांना जागीच पकडले.
त्या चौघांना सदर ठिकाणी हजर असण्याचे कारण विचारले असता ते काही एक समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे देवु लागले. त्यांची अंगझडती घेवून त्यांच्या कब्जातील पांढऱ्या रंगांची ईरटिगा कार वाहन क्र एमएच १० बी एम ७८३३ व पांढऱ्या रंगांची रिओ प्रिमीअर कार वाहन क्र एमएच १० बीएम ४५३४ या वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये
२०,४०,०००/- रु. किंमतीचा १०२ किलो वजनाचा तयार गांजा मिळून आला. त्या चौघांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गांजा हा सांगली व इतर जिल्हयात विक्रीसाठी आणला असल्याची कबुली दिली.
सदर इसमांच्या ताब्यात असलेला २०,४०,०००/- रु. किंमतीचा १०२ किलो वजनाचा तयार गांजा व गुन्हयात वापरलेले दोन चार चाकी वाहन असा एकुण २८,९०,०००/- रु चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून आरोपीविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली , अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल , उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांचे मार्गदर्शनाखालीस्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे , पो. उप.नि. विशाल येळेकर , पोहेकॉ जितेंद्र जाधव , पोहेकॉ राजु शिरोळकर , संदीप पाटील , पोहेकॉ मच्छींद्र बर्डे , पोहेकॉ अमोल ऐदाळे , पोहेकॉ राहुल जाधव , पोहेकॉ संकेत मगदुम , फोटोग्राफर पोहेकॉ प्रविण शिंदे , पोकों सचिन कनप , पोकों आर्यन देशिंगकर , पोकों गौतम कांबळे , पोकों अजय बेंदरे , पोकों कॅप्टन गुंडवाडे यांनी केली आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●