yuva MAharashtra एमपीएससी चा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासूनच ; या निर्णयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विद्यार्थ्यांकडून आभार.

एमपीएससी चा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासूनच ; या निर्णयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विद्यार्थ्यांकडून आभार.




======================================
======================================

     वांगी प्रतिनिधी : अ. शिकलगार 
        
 गेले सात - आठ महिन्यांपासून सातत्याने चर्चित असणारा राज्यसेवा मुख्य परीक्षा जी  एमपीएससी द्वारे आयोजित केली जाते तिचा नवीन अभ्यासक्रम २०२५पासून लागू करण्याचा निर्णय आयोगाने जाहीर केला.यासाठी विद्यार्थी वर्गाने सातत्याने आंदोलन केले होते.त्यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी याबाबत आयोगाला विनंती केली होती आणि विद्यार्थी वर्गाला सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
          या आंदोलनात सर्वपक्षीय लोकांनी व विविध विद्यार्थी संघटना यांनी आंदोलन करणाऱ्या एमपीएससी  विद्यार्थी वर्गाला पाठिंबा दिला होता.मोठ्या ताकदीने होणाऱ्या आंदोलनाचे अखेर या विद्यार्थी वर्गाला फलित मिळाले असून त्यांना २०२५पर्यंत जुन्या धर्तीवर अभ्यास करता येणार आहे.
           गेले अनेक वर्ष अभ्यास करणाऱ्या व बिकट परिस्थितीतून मार्ग काढत परिश्रम करणाऱ्या विद्यार्थी वर्गाला या निर्णयाचा नक्कीच फायदा होणार असल्याने या विद्यार्थी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.यावेळी शिवानी मोकळे हिच्यासह शंकर ठाकरे,अंकुश मावकर,शुभम मोकळे,अरविंद वलेकर, प्रकाश कोळेकर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                
  हा विजय खऱ्या अर्थाने विद्यार्थी एकजुटीचा असून सर्वच पक्ष,विद्यार्थी संघटना व अनेक सामाजिक संस्था यांचा मोलाचा पाठिंबा आम्हा विद्यार्थ्यांना मिळाला.राज्य लोकसेवा आयोग,मुख्यमंत्री व त्यांचे सरकार व इतर सर्वांचे आभार.हा विजय विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना समर्पित केला आहे.... कु.शिवानी संभाजी मोकळे

                 


 एमपीएससी विद्यार्थ्यांच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे साहेब यांचे आभार व्यक्त करताना शिवानी संभाजी मोकळे यावेळी सोबत आमदार गोपीचंद पडळकर

◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆


◆●◆●◆◆◆◆◆●◆◆◆●◆◆◆◆●◆●◆●◆●◆●◆●◆