बंद केलेल्या डी.पी तात्काळ जोडण्याचे दिले आदेश..
महावितरण संघर्ष समितीचे ॲड दिपक लाड श्रीदास होनमाने यांच्या नेतृत्वाखालील मोर्चाला यश..
विटा । दि. 13 फेब्रुवारी 2023
विटा डिव्हिजन अंतर्गत शेती वीज पंप कनेक्शन शेतकऱ्यांना पूर्व सूचना न देता बंद करण्यात आले होते, महावितरण संघर्ष समितीशी कमळापूर, आळसंद भाळवणी, बलवडी ,जाधव नगर येथील शेतकऱ्यांनी संपर्क साधला असता महावितरण संघर्ष समितीचे अभ्यासक श्रीदास होनमाने, ॲड दिपक लाड यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चाला यश आले आहे.
मोर्चामध्ये शेतकऱ्यांची मोठी गर्दी व शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून महावितरणच्या अधिकाऱ्यांना अक्षरशः घाम फुटला यावेळी आंदोलन स्थळी काही वेळ तणावाचे वातावरण देखील निर्माण झाली होते.
पूर्व सूचना न देता बंद केलेले वीज कनेक्शन तात्काळ जोडून देण्याचे,
महावितरण ने मान्य केले तसेच निवेदनातील प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत. असे वीज कायदा अभ्यासक श्रीदास होनमाने व ॲड. दीपक लाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
महावितरण संघर्ष समितीचे बाबुराव शिंदे सुरेखाताई जाधव प्रमोद पाटील.. यांच्यासह कमळापूरचे सरपंच जयकर साळुंखे, अडचणचे हिम्मत जाधव भाळवणीचे संजय मोहिते, दशरथ साळुंखे ,प्रवीण पवार यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी मोर्चामध्ये सहभाग घेतला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~