=====================================
=====================================
सांगली दि.०५ : व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज, कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे रिजनल मूट कोर्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अगरवाल यांनी केले. यावेळी परीक्षक अॅडव्होकेट व सॉलिसिटर कामिनी आहुजा (मुंबई) आणि के.सी कॉलेजचे प्रा. आशिष बोरसे उपस्थित होते. या रिजनल मूट कोर्ट स्पर्धेत राज्यातील एकूण नऊ लॉ कॉलेज सहभागी झाले होते.
या स्पर्धेत सांगलीतील एन.एस.सोटी लॉ कॉलेजच्या एफ.वाय.एलएलबी या वर्षातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, रिसर्चर म्हणून अमोल वेटम तर मूटर म्हणून गौरी मराठे, मोनाली जाखोटिया आदी विद्यार्थ्यांनी काम पाहिले. उत्तेजनार्थ द्वितीय विजेता म्हणून एन.एस.सोटी लॉ कॉलेजला पुरस्कार मिळाला. या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. अमित सवदी यांनी प्रोत्साहन दिले, प्रा. मनीष देशपांडे यांनी पूर्णवेळ मार्गदर्शन केले. ग्रंथपाल ए.बी.साळुंखे यांनी रेफरन्स पुस्तके देण्यास मदत केली. तर प्रा. प्रसाद कांबळे, डॉ.ए.डी.कुरणे यांचे देखील मार्गदर्शन लाभले. कॉलेज मार्फत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी प्रा.ए.व्ही.कुलकर्णी, प्रा.बी.के.जाधव, प्रा. निर्मला पाटील आदी उपस्थित होते.
■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■
■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■