yuva MAharashtra एकनाथ शिंदें गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं.. निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का..

एकनाथ शिंदें गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं.. निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का..

 
एकनाथ शिंदें गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं..
निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का..



======================================
======================================


मुंबई | दि. १७ फेब्रुवारी २०२३
--------------------------------------------------------------------

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अखेर धनुष्यबाण चिन्ह बहाल करण्यात आलेले आहे. हा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित होता. आज अखेर शिंदेंना धनुष्यबाण चिन्हं देण्यात आलेले आहे. या प्रकरणी सुप्रिम कोर्टात सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू होती. या दरम्यानआयोगाने हा निर्णय आज दिला आहे.
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना हे नाव मिळाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अनेक दिवसांपासून आयोगाकडून हा निर्णय प्रलंबित होता. अनेकांचे याकडे लक्ष लागले होते.आज ७८ पानांची निवडणूक आयोगाने निकालपत्र दिले आहे.एकनाथ शिंदें गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं..




        उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया..

◆काय बोलायचं हा सर्वात मोठा प्रश्न..ठाकरे

● आजचा निर्णय अनपेक्षित...ठाकरे

लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे का ? ठाकरे

● भाजपकडे स्वतः लढण्याची हिंमत नाही...ठाकरे

● हिम्मत असेल तर निवडणुका घ्या...ठाकरे

● महाराष्ट्रात मोदी हे नाव चालत नाही हे भाजपाला आता कळलं आहे..ठाकरे

● न्यायाधीश नेमण्याची प्रक्रिया असते तशीच आयुक्त नेमताना  असावी..ठाकरे

● बऱ्याच जणांना आता असे वाटले असेल की शिवसेना आता संपली परंतु शिवसेना तशी लेची पेची नाही...ठाकरे

● रामायणात रामाचा विजय झाला तसाच आमचा विजय होईल..ठाकरे

●देशात हुकूमशाहीची सुरुवात झालीय याची पंतप्रधानांनी घोषणा करावी..ठाकरे

● आता त्यांना न्यायमूर्ती नेमण्याचे अधिकार हवे आहेत...ठाकरे

● महाराष्ट्रात लोकशाहीचे वस्त्रहरण सहन करणार नाही..ठाकरे

● धनुष्यबाण शिंदेंना मिळणार हे राणे आधीच कसे म्हणाले ?..ठाकरे

●  धनुष्यबाण शिंदे यांनाच मिळणार हे फडणवीस देखील म्हणाले होते...ठाकरे

●कदाचित आता मशाल देखील काढून घेतील...ठाकरे

●धनुष्यबाणाची चोरी शिंदे गटाला पचणार नाही...ठाकरे

● निवडणूक आयुक्तांनी केलेले थोतांड अत्यंत भयानक...ठाकरे

●या कटात कोण कोण सहभागी आहेत आता जनतेला समजले आहे...ठाकरे

●सुप्रीम कोर्ट ही आता शेवटची आशा..ठाकरे

● धनुष्यबाण ओरबाडून घेता येणार नाही..ठाकरे

● हिम्मत सोडू नका..जिद्द सोडू नका..
शिवसैनिकांनो खचू नका उद्धव ठाकरे यांचे आवाहन..




●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●


◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆