yuva MAharashtra शिराळा पोलीस ठाणे हद्दीत खुनासह दरोडा टाकणारी टोळी जेरबंद.. ..स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरी ..

शिराळा पोलीस ठाणे हद्दीत खुनासह दरोडा टाकणारी टोळी जेरबंद.. ..स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरी ..



=============================

=============================



सांगली | दि. 8 फेब्रुवारी 2024

सांगली जिल्ह्यातील शिराळा पोलीस ठाणे हद्दीतील निगडी गावाच्या शिवारात शेतातील वस्तीवरील घरात राहत असलेल्या वयोवृद्ध दांम्पत्यांवर खुनी हल्ला करून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व एक मोटर सायकल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
मगऱ्या अशोक ऊर्फ अजीतबाबा काळे वय १९ रा, येवलेवाडी ता. वाळवा जि. सांगली , तक्षद ऊर्फ स्वप्नील पप्या काळे वय.२६ रा. कार्वे ता. वाळवा जि.सांगली , गोपी ऊर्फ टावटाव त्रिशुल ऊर्फ तिरश्या काळे वय १९ रा. ऐतवडे खु. ता. वाळवा जि.सांगली अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.







स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक १७.०१.२०२३ रोजी शिराळा पोलीस ठाणे हद्दीत निगडी गावाच्या शिवारात श्री सदाशिव दादु सांळुखे व हिराबाई सदाशिव सांळुखे हे वयोवृद्ध दांम्पत्य राहत असलेल्या त्यांच्या शेतातील घराचा रात्रीचेवेळी अज्ञात चोरटयांनी घराचा बंद दरवाजा तोडुन घरात प्रवेश करून घरामध्ये झोपेत असलेले हिराबाई साळुंखे यांच्या अंगावरील सोन्याचे दागीने जबरदस्तीने काढून घेताना त्यांनी विरोध केल्यामुळे अज्ञात इसमांनी सदाशिव सांळुखे व हिराबाई यांना कोणत्यातरी हत्याराने दोघांना डोकीत जबर मारहाण करुन गंभीर जखमी करून दागीने चोरून नेले, यातील जखमी हिराबाई सांळुखे यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. या गुन्हयाची शिराळा पोलीस ठाणे येथे जबरी चोरी करत गंभीर जखमी केले बाबतचा गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्हयाचे घटनास्थळी मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल , उपविभागीय पोलीस अधिकारी पदमा कदम यांनी भेट देऊन घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती घेतली व
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर यांना सदरची जबरी चोरी करण्यासाठी केलेल्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या.

मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम यांनी पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्था.गु.अ. शाखा यांना सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणणेकरीता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सपोनि संदिप शिंदे व सोबत पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते.
त्याप्रमाणे वरील पथकाने गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट देऊन गुन्हयाचा तपास चालू केला. सदर घटनेचे घटनास्थळ हे अतिशय डोंगराळ व दुर्गम भागात असलेने स्थानिक पातळीवर कौशल्यपूर्ण तपास करीत पथकाने अभिलेखावरील गुन्हेगार, जेल रिलीज झालेले व जामीनावरील गुन्हेगार तसेच आजुबाजुच्या जिल्हयामधील अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या टोळ्या यांच्या हालचालीवर लक्ष केंद्रीत करून अहमदनगर, सोलापुर, सातारा जिल्हयात छापे मारून चेक केले होते. गुन्हयाचे अनुषंगाने माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकातील अंमलदार सुनिल चौधरी, उदयसिंह माळी, संकेत कानडे यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा मगऱ्या काळे व त्याचे साथीदार यांनी केला असुन ते लक्ष्मी फाटा इस्लामपुर रोड परिसरात असलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्या मिळालेल्या माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सपोनि संदीप शिंदे व पथकाने लक्ष्मी फाटा इस्लामपुर रोड परिसरात सापळा लावुन संशयित इसम मगऱ्या अशोक ऊर्फ अजीतबाबा काळे , तक्षद ऊर्फ स्वप्नील पप्या काळे व गोपी ऊर्फ टावटाव त्रिशुल ऊर्फ तिरश्या काळे यांना ताब्यात घेतले. या तिन्ही संशयित आरोपींची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, एक मोटर सायकल असा मुद्देमाल मिळुन आला. त्यांचेकडे मिळुन आले सोन्याचे दागिने व रोख रकमेबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरचे सोन्याचे दागिने हे शिराळा येथील रात्रीचे वेळी निगडी येथील एका शेत वस्तीवरील घरावरती दरोडा टाकुन घरातील लोकांना मारहाण करून सोन्याचे दागिने लुटून चोरी केले आहेत अशी कबुली दिली. तसेच त्यातील काही दागिने हे त्यांनी काही दिवसापुर्वी कासेगांव शिराळा हद्दीत रात्रीचे वेळी घरफोडी करून चोरलेले दागिन्यापैकी असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींच्या अंगझडतीमध्ये गुन्हयात चोरी गेलेला ३,१०,६००/- रु.किंमतीचा मुद्देमाल व ६०,०००/- रू किंमतीचा गुन्हयात वापरलेली दुचाकी वाहन असे एकुण ३,७०,६००/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन या तिन्ही सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली , अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल , उपविभागीय पोलीस अधिकारी पदमा कदम , यांचे मार्गदर्शनाखाली




पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार (शिराळा पो ठाणे ) सपोनि संदीप शिंदे सुनिल चौधरी, उदयसिंह माळी, बिरोबा नरळे, संदीप गुरव, सागर लवटे, अनिल कोळेकर, सागर टिंगरे, संकेत कानडे, ऋषीकेश सदामते, संतोष गळवे, विक्रम खोत, जितेंद्र जाधव, शुभांगी मुळीक, कॅप्टन गुंडवाडे, प्रकाश पाटील अकुंश ढवळे, अमोल कोतकर, सत्यजीत पाटील, अजय बेंद्रे, सुधीर गोरे यांनी केली आहे.

सदर गुन्हयातील आरोपी मगऱ्या अशोक ऊर्फ अजीतबाबा काळे हा अभिलेखावरील गुन्हेगार असुन त्याचेवर कासेगांव, आष्टा व इस्लामपुर पोलीस ठाण्यात जबरी चोरी , घरफोडी सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

या गुन्हयामध्ये अजुन २ आरोपी निष्पन्न झाले असुन त्यांचा शोध सुरू आहे. गुन्हयाचा पुढील तपास शिराळा पोलीस ठाणे करीत आहे.

■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■


■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■