गट नेते शरदभाऊ लाड यांच्या वाढदिवसानिमित्त दर महिन्याला कायमस्वरूपी रक्तदान शिबीराचे आयोजन
======================================
======================================
कुंडल | दि. २१ फेब्रुवारी २०२३
--------------------------------------------------------------------
देशातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता
गट नेते शरदभाऊ लाड यांच्या वाढदिवसानिमि दरत्त महिन्याला कायमस्वरूपी रक्तदान शिबीराचे आयोजन शरद फाउंडेशन संचिलीत शरद आत्मनिर्भर अभियानामार्फत करण्यात आले आहे.
याचा शुभारंभ आज कुंडल (ता पलूस) येथे आमदार अरुणअण्णा लाड यांच्या हस्ते झाला. पहिल्याच शिबिरात 144 रक्त दात्यांनी रक्तदान केले. हे शिबिर पलूस आणि कडेगाव तालुक्यात एम. एस. आय. ब्लड सेंटर, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने राबविले जाणार आहे.
यावेळी आमदार अरुणअण्णा लाड म्हणाले, शरद आत्मनिर्भर योजने अंतर्गत अनेक कुटुंब उभी केली जात आहेत पण देश पातळीवर रक्ताचा पडणारा तुटवडा लक्षात घेता पलूस कडेगाव तालुक्यातील प्रत्येक गावात कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रक्तदानाची ही चळवळ राबविली जाणार आहे. प्रत्येक महिन्याला एक असे रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. यातून भविष्यात कोणालाही रक्ताशिवाय जीव गमवावा लागणार नाही यासाठी अविरत प्रयत्न करणार आहोत या उपक्रमाला जास्तीत लोकांनी सहभाग द्यावा असे आवाहन त्यांनी केले.
शरद आत्मनिर्भरद्वारे सुरू केलेल्या पहिल्या रक्तदान शिबिराचे उदघाटन आमदार अरुणअण्णा लाड यांच्या हस्ते झाले.
यावेळी तालुकाध्यक्ष मोहन पाटील, दीपक मदने, विनायक महाडीक, नंदा पाटील, पूजा लाड, सुरेश शिंगटे, विराज पवार, प्रतीक पाटील, कार्यकारी संचालक सी.एस.गव्हाणे, सचिव आप्पासाहेब कोरे, लेबर ऑफिसर विरेंद्र देशमुख, प्रवीण विभूते, यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●