yuva MAharashtra स्काऊट गाईड चिंतन उत्साहात संपन्न

स्काऊट गाईड चिंतन उत्साहात संपन्न



=====================================
=====================================

सांगली दि. 23/02/2023
 
सांगली भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा् कार्यालय सांगलीच्या वतीने लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांची जयंती चिंतन दिन व विश्व बंधुत्व दिवस विविध कार्यक्रमाने मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.


चिंतन दिनाचे औचित्य साधून सांगली भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयात निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रस्तुत स्पर्धेमध्ये सांगली शहरातील अभिनव बालक मंदिर,वि रा. वेलणकर बालक मंदिर,आयडियल स्मार्ट स्कूल मिरज,डॉ. बापट बाल शिक्षण मंडळ,ज्युबिली कन्या शाळा मिरज, डॉ. देशपांडे बाल विद्यामंदिर,श्रीमती सोनाबाई आण्णासो पाटील कन्या शाळा कुपवाड या शाळांतील  एकूण 62 कब-बुलबुल,स्काऊट-- गाईडनी सहभाग नोंदविला आहे.






श्रीमंती आण्णासाहेब पाटील हायस्कूल नांद्रे, जि. प. शाळा नं. 1 गोटखिंडी, जत हायस्कूल जत,सौ. लिलाताई देशचौगुले प्रा. विद्यामंदिर विटा स्काऊट गाईड विभागातर्फे चिंतन दिन साजरा करण्यात आला. तसेच सांगली भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालयात संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन स्काऊट गाईड चिंतन दिन साजरा करण्यात आला. 





      या प्रसंगी जिल्हा संघटक स्काऊट कैलास कापवार,जिल्हा संघटक गाईड श्रीमती सविता भोळे,वरिष्ठ लिपीक संजय मलकुवार कनिष्ठ लिपीक श्रीमती दिपाली लोंढे, अमोल राठोड, स्काऊटर - गाईडर  शिल्पा, सोनल सनमुख,श्रीमती वैशाली पाटील,प्रियांका नांगरे,शाहीन मुजावर, नितीन ढाले,ज्ञानेश्वर पोतदार  इत्यादी उपस्थित होते.
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆


◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆