yuva MAharashtra भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेले ट्रॅक्टर व ट्रॉल्या मोहाळ पोलीस ठाणे येथून ताब्यात घेऊन मुळ मालकांना परत दिले...

भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेले ट्रॅक्टर व ट्रॉल्या मोहाळ पोलीस ठाणे येथून ताब्यात घेऊन मुळ मालकांना परत दिले...



======================================

========================



भिलवडी | 23 फेब्रुवारी 2023

भिलवडी ( ता.पलूस ) पोलीस ठाणे  हद्दीतून अर्जुन मॉडेलचा आरटिओ क्रंमाक एम.एच.१० ए. वाय. ४१० व उमा शंकर कंपनीच्या  एम.एच.१० डब्लु ८३६२ व एम.एच.१० डब्लु ८३६३ अशा दोन ट्रॉल्या चोरीला गेला असल्याची तक्रार श्रीनिवास जर्नादन पाटील रा. माळवाडी ता. पलूस यांनी दिनांक १४/०३/२०१९ रोजी भिलवडी पोलीस ठाण्यात दिली होती. या गुन्ह्याचा तपास  सपोनि नितीन सांवत यांच्याकडे होता.



तसेच जालिंदर विश्वनाथ बाबर रा. चोपडेवाडी ता. सांगोला यांनी  भगवा रंग असलेल्या चार चाकी दोन ट्रॉल्या चोरीला गेली असल्याची तक्रार दि. १७/०४/२०१८  रोजी भिलवडी पोलीस ठाण्यात दिली होती. या गुन्ह्याचा तपास 
सपोफौ एम. एस. मोरे यांच्याकडे होता.



संजय बाळकृष्ण मांडवे रा. भिलवडी ता.पलूस यांचा निळ्या रंगाचा न्यू हॉलंड ट्रॅक्टर चेसीसनं २१२५२२८ व चॉकलेटी कलरच्या दोन ट्रॉल्यांची चोरी झाल्याची तक्रार त्यांनी दि.१५/०३/२०२१ रोजी भिलवडी पोलीस ठाण्यात दिली होती. या चोरीच्या घटनेचा गुन्हा भिलवडी पोलीस ठाण्यात दाखल असून या गुन्ह्याचा तपास पो.ना.जी.एस.चव्हाण यांच्याकडे होता.



भिलवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू होता.
दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने ट्रॅक्टर व ट्रॉल्या चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला व त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आणि सदर गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक केली.
मोहोळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईत भिलवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ट्रॅक्टर व ट्रॉल्या चोरीचा तपास लागला. 
बंडया ऊर्फ बंडु कुमार पवार रा. खरसोळी ता. पंढरपुर जि.सोलापुर आणि पप्पू कुबेर ओहाळ रा. खरसोळी ता. पंढरपुर जि. सोलापुर अशी या गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत.






भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेला माल मोहाळ पोलीस ठाणे जि. सोलापुर येथून ताब्यात घेणेत आला असून ट्रॅक्टर व ट्रॉली मुळ मालकांची ओळख पटवुन त्यांना ताब्यात देणेत आला आहे. सध्या आरोपी मोहोळ पोलीस ठाणेचे ताब्यात असून आरोपींचा ताबा घेवून पुढील कारवाई  मा.पोलीस अधीक्षक सो, सांगली मा. अपर पोलीस अधिक्षक सो, सांगली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी तासगांव यांचे सुचने प्रमाणे करीत आहोत. अशी माहिती भिलवडी पोलीस ठाण्याचे सहा.पो.नि.नितीन सावंत यांनी दिली आहे.

◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆



◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆