=====================================
=====================================
भिलवडी | दि. 19 फेब्रुवारी 2023
-------------------------------------------------------------------
भिलवडी (ता.पलूस) : राष्ट्रगीताचे गाव म्हणून ओळख निर्माण करून देणाऱ्या व्यापारी संघटनेने सालाबाद प्रमाणे आज भिलवडी येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली.
या शिवजयंतीच्या उत्सवासाठी भिलवडी गावचे प्रथम आयएएस अधिकारी श्री. प्रकाश भुपाल मगदूम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्यांचे नुकतेच 'द महात्मा ऑन सेल्यु लॉईड ' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे .
या कार्यक्रमा मध्ये बालकवी श्री सुभाष कवडे सर, लेखक श्री. संपतराव तोरस्कर , श्री. अभिषेक दत्तात्रय साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. नितीन सावंत साहेब , उद्योजक मकरंद चितळे यांचा सत्कार घेण्यात आला.
त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये भिलवडी गावचे नाव एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणारे श्री विजय सुभाष वावरे यांची बीसीसीआय लेव्हल वन कोच म्हणून निवड झाली आहे, यावेळी निवड झालेल्यांमध्ये ते महाराष्ट्रातील एकमेव कोच आहेत ही भिलवडीकरांसाठी गौरवास्पद बाब आहे. शिवजयंतीचे औचित्य साधून त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी व्यापारी संघटनेचे सर्व पदाधिकारी, संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजय हुडकले सर यांनी केले.
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆
◆●◆●◆●◆●◆●◆●◆◆◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●