आर.पी.आय.(आ.) पलूस तालुक्यासह इतर पदाधिकारी निवड कार्यक्रम संपन्न.
=====================================
पलूस दि. २७ फेब्रुवारी २०२३
----------------------------------------------------------------------
रविवार दि. २६/०२/२०२३ रोजी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया(आठवले) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा सां.मि.कु. शहर महानगरपालिकेचे मा. महापौर व विद्यमान नगरसेवक मा. विवेकरावजी कांबळे साहेब आमंत्रीत पलुस तालुक्याच्या दौर्यावर होते. मा. कांबळे साहेबांचे पलुस गेस्ट हाऊस येथे आगमन होताच आर.पी.आय. पलुस तालुका युवक आघाडीचे वतीने तुफान फटाक्यांची अतिषबाजी करून भव्य स्वागत करणेत आले.
यावेळी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया(आठवले) पलुस तालुका युवक आघाडीचे वतीने युवा कार्यकर्ता संपर्क मेळावा आयोजित करणेत आला होता. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष मा. राजेंद्रजी खरात, जिल्हा संघटक मा. नवनीत लोंढे, वकील आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष मा. ॲड. तुषार लोंढे, मुस्लिम आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र सदस्य मा. मुजावरसो, सोशल मिडीया आय.टी.सेलचे सांगली जिल्हाध्यक्ष मा. योगेंद्र कांबळे, विशाल काटे, पलुस कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष मा. विशाल तिरमारे, तासगाव तालुका अध्यक्ष मा. प्रविण धेंडे, कडेगाव तालुका अध्यक्ष मा. जितेंद्र सरोटे, आटपाडी तालुका सरचिटनीस मा. रंजित ऐवळे, जेष्ठ सदस्य मा. नामदेव खरात, आय.टी.सेलचे मिरज शहर अध्यक्ष मा. पृथ्वीराज रांजणे, पलुस कडेगाव विधानसभा क्षेत्र उपाध्यक्ष मा. शितल मोरे, जेष्ठ सदस्य मा. विजय कांबळे, यांचेसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रथमतः महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. विवेकरावजी कांबळे साहेब व जिल्हाध्यक्ष मा. राजेंद्रजी खरात यांचे हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस दिप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. यावेळी रिपब्लिकन(आठवले) पलुस तालुका युवक आघाडीचे वतीने उपस्थित मान्यवरांना फेटाबांधून व पुष्पहार घालून स्वागत सत्कार करणेत आला.
कार्यक्रमाचे प्रास्तविक पलुस कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष मा. विशाल तिरमारे यांनी केले. यावेळी युवा व्याख्याते मा. अभिजीत कोळी, मा. नवनीत लोंढे, मा. राजेंद्रजी खरात यांनी उपस्थित युवक कार्यकर्त्यांना रिपब्लिकन पक्ष ध्येय,धोरण,संकल्पना व धर्मनिरपेक्ष चळवळ याबाबतीत मार्गदर्शन करून मनोगत व्यक्त केले.
यावेळी रिपब्लिकन(आठवले) युवक आघाडी पलुस तालुका, मुस्लिम आघाडी खानापूर तालुका व सांगली जिल्हा कार्यकारणी पदाधिकार्यांची निवड करणेत आली.
१) युवक पलुस तालुका अध्यक्ष पदी मा. अविराज काळेबाग यांची फेरनिवड करणेत आली.
२) युवक पलुस तालुका सरचिटनीस पदी मा. पृथ्वीराज घाडगे.
३) युवक पलुस तालुका उपाध्यक्ष पदी मा. यश ऐवळे.
४) सांगली जिल्हा उपाध्यक्ष पदी मा. चंद्रकांत कांबळे.५) रिपब्लिकन(आठवले) मुस्लिम आघाडी खानापूर तालुका अध्यक्ष पदी मा. बशीरभाई मुजावर यांची निवड करणेत आली. नवनिर्वाचीत पदाधिकार्यांना मा. विवेकरावजी कांबळे साहेब व मा. राजेंद्रजी खरात यांचे हस्ते निवडपत्र देऊन पुष्पहार घालून पुढील वाटचालीस शुभेच्छा देणेत आल्या.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. विवेकरावजी कांबळे उपस्थित युवकांस मार्गदर्शन करताना म्हणाले, केंद्रीय मंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.डॉ. रामदासजी आठवले साहेबांच्या रिपब्लिकन पक्षामध्ये सामील झालेल्या सर्व युवकांचे हार्दिक स्वागत. रिपब्लिकन संकल्पना ही लढवय्यी वृतीची असून रिपब्लिकन पक्षा मध्ये सहभागी होणारा तरूण हा अन्याय व अत्याचारा विरूद्ध नक्कीच गुरगुरणारा असणार आहे. धर्मनिरपेक्ष राजकारण ही काळाजी गरज असून सर्व जाती धर्मातील जनतेला न्याय मिळवून देणारा पक्ष म्हणजे रिपब्लिकन(आठवले) पक्ष आहे. पक्षामध्ये कार्यकरणारा कार्यकर्ता हा स्वावलंबी पाहीजे, समाजहीता करिता झटणारा पाहीजे, प्रशासनावर जबरदस्त पकड असलेला कार्यकर्ता हा समाजातील अडीअडचणी दुर करू शकतो. याकरिता पदाधिकार्याकडे संघटन कौशल्य असणे खुप महत्वाच आहे. तरी सर्व नुतन पदाधीकार्यांनी पक्ष संघटना वाढविणेचे कार्य करायचे आहे. पक्षाचे अधिकृत सदस्य वाढवणे या कडे लक्ष केंद्रित करायचे आहे. रिपब्लिकन पक्ष हा गोरगरिब कष्टकरी लोकांचा पक्ष असून कोणत्याही समस्येवर पाठपुरावा करत असताना "झुकेगा नहीं साला" ही इच्छाशक्ती ठेवल्यास कधीच हार पत्करावी लागणार नाही हे प्रतेकाने आत्मसात करून घ्यायच आहे.
यावेळी पलुस तालुक्यामधून शेकडो कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थित होते. शेवटी पलुस कडेगाव विधानसभा क्षेत्र उपाध्यक्ष मा. शितल मोरे यांनी सर्वांचे आभार मानले.
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆◆●