सूर्यवंशीवाडी (येळावी)शाळेत दुसरे बालकुमार साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
=====================================
=====================================
भिलवडी | दि.०४ मार्च २०२३
--------------------------------------------------------------------
जिल्हा परिषद शाळा सूर्यवंशीवाडी (येळावी) ता. तासगांव व सानेगुरुजी संस्कार केंद्र भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे बालकुमार साहित्य संमेलन विविध साहित्यिक उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाले.सुप्रसिद्ध वक्ते वसंत हंकारे अध्यक्षस्थानी होते.विविध वाद्यांच्या गजरात ग्रंथ दिंडी काढण्यात आली.
बालवाड़मय पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन,सरस्वती पूजन व रोपांना पाणी घालून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच २८ फेब्रुवारी विज्ञान दिन असल्याने संमेलनात विज्ञान प्रदर्शन भरवले.पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांचे मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे कविसंमेलन संपन्न झाले.पाहुणे म्हणून सुनिल दबडे, सौ.वर्षा चौगुले , ह. रा.जोशी उपस्थित होते.यावेळी शाळेतील पन्नास विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या.दुसऱ्या सत्रात रवी राजमाने व संदिप नाझरे यांनी बालकथा सादर केल्या.त्यास उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.तसेच दहा विद्यार्थ्यांनी बोधकथांचे सादरीकरण केले.तिसऱ्या सत्रात हास्ययात्राकार शरद जाधव यांनी विनोदी एकपात्री प्रयोग सादर करून मुलांना पालकांना खळखळून हसविले.चौथ्या सत्रात सुप्रसिद्ध कथाकथनकार
जयवंत आवटे यांचे बहारदार कथाकथन झाले.यावेळी बोलताना वसंत हंकारे म्हणाले की,लिखित साहित्य हे प्रत्यक्ष संस्कारात उतरणे गरजेचं आहे.संस्कार कधी सांगून आणि शिकवूण होत नाहीत तर ते आचरणातूनघडतात.अध्यात्म,विज्ञान,साहित्याचा उद्देश्य फक्त वैचारिक परिवर्तन असून,परिवर्तन व्हायचे अपेक्षित असेल तर प्रत्येकाने आनंदी जीवन जगावे लागेल.
प्रास्ताविक रविंद्र सूर्यवंशी माजी उपसरपंच येळावी यांनी केले. स्वागत डॉ. दिपक सुर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचलन सौ. मेघाली पाटील यांनी केले.आभार अजित सूर्यवंशी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी मानले.संतोष पाटील व जयश्री पवार या सहकारी शिक्षकांनी यशस्वीरीत्या संमेलनाचे संयोजन केले. यावेळी साहित्यिक सुभाष कवडे, गझलकार सुधीर इनामदार,विजय आण्णा पाटील ,विशाल पाटील,अनिल नाना पाटील, सरपंच सौ.छाया पिसाळ, उपसरपंच मौला शिकलगार आणि सर्व सदस्य,तासगांव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आबासो लावंड, विस्ताराधिकारी रेहना मिरजकर, प्रकाश कांबळे, केंद्रप्रमुख गजानन दौंडे,प्रा.विश्वास यादव, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच सूर्यवंशी परिवारातील सर्व सदस्य,पालक,बालसाहित्यिक उपस्थित होते.
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆◆●
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆◆◆◆◆●◆◆◆◆◆◆
◆●◆●◆●◆◆◆●◆◆◆●◆●◆●◆●◆●◆◆◆●◆◆◆◆