yuva MAharashtra सांगली जिल्हा सहा. कामगार आयुक्त मा.अनिल गुरव यांची मुंबई येथे कामगार उपायुक्त म्हणून पदोन्नती..

सांगली जिल्हा सहा. कामगार आयुक्त मा.अनिल गुरव यांची मुंबई येथे कामगार उपायुक्त म्हणून पदोन्नती..



 विविध  कामगार संघटनांच्या वतीने सहा. कामगार आयुक्त मा.अनिल गुरव यांचा गौरव..

=====================================
=====================================

सांगली | दि. १६ मार्च २०२३
--------------------------------------------------------------------
सांगली दि.१६ : सांगली जिल्हा सहा. कामगार आयुक्त, कर्तव्य दक्ष अधिकारी अनिल गुरव  यांची "स्वतंत्र औद्योगिक संबंध", मुंबई येथे कामगार उपायुक्त म्हणून पदोन्नती झाली आहे. त्यांनी सांगली जिल्हा सहा. कामगार आयुक्त म्हणून अत्यंत उत्कृष्टपणे काम पाहिलेआहे. नुकतीच त्यांची मुंबई येथे कामगार उपायुक्त म्हणून पदोन्नती झाली त्याबद्दल सर्व क्षेत्रात काम करीत असणारे विविध कामगार संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या मार्फत अनिल गुरव  यांना  संविधान उद्देशिका देऊन गौरविण्यात आले.व त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.


यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव मा.प्रशांत वाघमारे, सेवक आरोग्य व बांधकाम इतर असंघटित श्रमिक कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष मा.उमरफारूक ककमरी, जिल्हाध्यक्ष मा.संजय संपत कांबळे, जिल्हा संपर्कप्रमुख मा.संजय भूपाल कांबळे तसेच इब्राहिम पेंढारी,मराप्पा राजरत, युवराज कांबळे, विक्रांत सादरे, प्रताप पाटील,उमेश आरगुणे यांच्या बरोबर बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆



◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆