yuva MAharashtra लोकप्रतिनिधींच्या पेन्शन चा ठराव पास होतो मग कर्मचार्यांचा का होत नाही? : किरण लाड.

लोकप्रतिनिधींच्या पेन्शन चा ठराव पास होतो मग कर्मचार्यांचा का होत नाही? : किरण लाड.



  ➡️                              व्हिडीओ पहा
                                             👇



==============================
======================================
कुंडल | दि. १९ मार्च २०२३
------------------------------------------------------
      आमदार, खासदारांच्या पगाराचा अन पेन्शन चा ठराव एकमताने मंजुर होत असेल तर मग तीस पस्तीस वर्षे काम करणार्या कर्मचार्यांच्या पेन्शनचा ठराव का मंजूर होत नाही असा सवाल सांगली जिल्हा मध्य.बँकेचे माजी संचालक किरण लाड यांनी उपस्थित करुन पेन्शन हा कर्मचार्यांचा अधिकार असून तो मिळालाच पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले, ते कुंडल( पलूस) येथे एक नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या राज्यातील सर्वच शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी  14 मार्चपासून सुरु असलेल्या बेमुदत बंद च्या आज पाचव्या दिवशी पलूस तालुक्यातील सर्व सघटनांच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांतीअग्रणी डाॕ.जी.डी.बापू लाड यांच्या समाधीस अभिवादन करुन आज क्रांतीअग्रणींच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळी किरण लाड बोलत होते.
       यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद लाड आदीसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
  किरण लाड पुढे म्हणाले स्व.क्रांतिअग्रणी जी.डी.बापूंनी आयुष्यभर कष्टकरी कामगारांच्या हक्कासाठी  लढले. बापूंनी स्वातंत्र्यानंतरही अनेक चळवळीत भाग घेतला होता.तत्कालीन  तासगाव कारखान्यांच्या कामगारांच्या पगाराचा प्रश्न बापूसाहेबांनी लढून मिटविला.नाना पाटील व बापूंच्या  विचाराचा वारसा जपून सुरु असलेले हे आंदोलन यशस्वी ठरेल.
       कर्मचार्यांना पेन्शन मिळालीच पाहिजे तसेच शेतकर्याला ही काहितरी मिळाले पाहिजे यासाठीही तुम्ही प्रयात्न केले पाहिजे असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. शासकीय कर्मचारी हा नोकर नाही तर तो सेवेकरी आहे तो शासनाच्या विविध सेवा सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्याचे काम करत असतो. तो शासन व जनता यांच्यामधील दुवा असतो त्याला त्याचे हक्क मिळालेच पाहिजेत असे सांगून आ.अरुण अण्णा लाड यांचेसह संपूर्ण क्रांती परीवार या आंदोलनाच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.


       प्रारंभी क्रांतासिंह नाना पाटील , क्रांतिअग्रणी डाॕ. जी.डी बापूं लाड यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील महान कार्याचा व त्यांनी केलेल्या जनलढ्याचा आढावा मारुती शिरतोडे यांनी आपल्या प्रास्ताविकात घेतला.त्यानंतर दोन्ही पुतळ्यांना अभिवादन करुन जी.डी.बापूंच्या समाधीचे दर्शन आंदोलनकर्त्यांनी घेतले व जुनी पेन्शन सह इतर मागण्यांच्या घोषणा दिल्या. त्यानंतर समाधीस्थळ परिसरामध्ये झालेल्या सभेमध्ये नितीन चव्हाण,तेजल शितापे, शैलजा चव्हाण, सौ.वैशाली कोळेकर, रोहित गुरव, बिना माने,शरद जाधव,आक्काताई थोरात,के.टी. पाटील,सी.वाय जाधव यांचेसह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. गेले पाच दिवस संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यातील आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या सर्व संघटना समन्वय समितीचे तालुका निमंत्रक,तथा शिक्षक संघटनांचे जिल्हा निमंत्रक  बाबासाहेब लाड, यांनी पाचव्या दिवसाच्या आंदोलनाची रुपरेषा स्पष्ट केली यावेळी  चंद्रकांत जाधव, नितिन जाधव,  नितीन चव्हाण ,सुनिल गुरव, रोहीत गुरव, समिर मुल्ला,  संतोष चव्हाण,  विकी कांबळे,  बाजीराव पवार, महादेव यल्लाटे,  रोहित सोळवंडे,राम चव्हाण, विष्णुपंत रोकडे,सचिन तुपे,राजेंद्र कांबळे यांचेसह विविध संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
मनोगत... 

 
बाबांच्या सारखी साथ द्या...शैलजा चव्हाण
     
    जुन्या पेन्शन योजनेत असूनही २००५ नंतर च्या डी.सी.पी.एस. मधील कर्मचार्यांना जुनी पेन्शन मिळावी म्हणून नावाप्रमाणेच सर्व कर्मचार्यांचे बाबा असणार्या बाबा लाड सरांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर ही आमच्या पाठीशी रहावे असे भावनिक आवाहन सौ. शैलजा चव्हाण यांनी यावेळी केले.


जुन्या पेन्शनसाठी सुरु असलेल्या बेमुदत काम बंद आंदोलना दरम्यान आंदोलनकर्त्यांनी  कुंडल येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांचेसह क्रांतिअग्रणी जी.डी.बापूंच्या पुतळ्यास अभिवादन केले यावेळी जिल्हा परीषद सदस्य शरद लाड, जिल्हा बँकेचे संचालक किरण लाड , शिक्षक नेते बाबा लाड, काॕ.मारुती शिरतोडे, नितिन जाधव आदीसह विवीध संघटनांचे पदाधिकारी व आंदोलनकर्ते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆