=====================================
=====================================
सांगली दि. २६ : आटपाडी आवळाई रस्त्यावर बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल स्कॉर्पिओमधून घेऊन फिरणाऱ्या दोघांना सांगली पोलीसांनी अटक आहे. त्यांच्याकडून एक पिस्तूल, तीन काडतुसे, स्कॉर्पिओ असा सात लाख पन्नास हजार सहाशे रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
परशुराम रमेश करवले, वय २३, रा. कृष्णामाई घाट समोर, कराड सध्या रा. साठे नगर चौक, व रविराज दत्तात्रय गोरवे, वय १९, रा. मनिषा नगर, महुद, ता. सांगोला, जि. सोलापूर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक विशेष पथक तयार केले होते. या पथकातील पोलीस अधिकारी, कमर्चारी आटपाडी परिसरात गस्त घालत असताना आटपाडी-आवळाई रस्त्यावरील गुरुकूल शाळेजवळ असणाऱ्या मोकळ्या मैदानात स्कॉर्पिओमध्ये दोघेजण पिस्तूल घेऊन थांबल्याची माहिती गोपनीय खबऱ्याद्वारे मिळाली.
त्यानंतर पथकाने तेथे सापळा रचून गाडीतील दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तूल, तीन काडतुसे सापडली. पिस्तूलाबाबत करवले याच्याकडे चौकशी केल्यानंतर गोरवे हा ते पिस्तूल तेथे खरेदी करण्यासाठी आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली.व त्यांच्याकडून गुन्हयात वापरलेले वाहन काळ्या रंगाची स्कार्पिओ गाडी, एक देशी बनावटीचे पिस्टल (अग्निशत्र) व जिवंत ०३ काडतुसे असा एकुण ७,५०,६००/- रु (सात लाख पन्नास हजार सहाशे रु.) किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपींचे विरुध्द आटपाडी पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार अधिनियम कलम १९५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, सातारा (अतिरिक्त कार्यभार), यांचे मार्गदर्शनाखाली
पुढील तपास आटपाडी पोलीस ठाणे करीत आहे.
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे , पोलीस निरीक्षक शरद मेंमाणे , सहा पोलीस निरीक्षक संदीप शिंदे , पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर , अमोल ऐदाळे, सचिन कनप, सुनिल जाधव, मच्छिद्र बर्डे, गौतम कांबळे, अजय बेंद्रे, आर्यन देशिंगकर, संदीप पाटील प्रकाश पाटील, कॅप्टन गुंडवाडे, आटपाडी पोलीस ठाणे कडील पोहेकाँ उमर फकीर, पोकाँ प्रमोद रोडे यांनी केली आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆