=====================================
=====================================
भिलवडी | दि. २७ मार्च २०२३
पलूस तालुक्यातील अंकलखोप येथील समाजकंटक पांडुरंग मधुकर सुर्यवंशी यांने शुक्रवार दिनांक २४ मार्च २०२४ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर , भगवान गौतम बुध्द तसेच मुस्लीम समाजाचे श्रध्देय स्थान अल्ला यांचे विषयी जाणुन भुजून मागासवर्गीय समाजाच्या तसेच मुस्लीम समाजाच्या भावना दुखवण्याचे उद्देशाने आक्षेपार्ह मजकुर लिहून फेसबुक अल्पीकेशन वरती पोस्ट केली होती. त्यामुळे तमाम मागासवर्गीय समाज व मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.
पांडुरंग मधुकर सुर्यवंशी या समाजकंटकावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत जास्तीत जास्त गुन्हे दाखल करावेत.
त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
या प्रकरणामध्ये आणखीन कोणी त्याचे साथीदार असतील तर याची सखोल चौकशी करण्यात यावी.
महापुरुषांच्या विटंबना , मागासवर्गीय समाजावर आक्षेपार्ह विधान करणे अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात वारंवार होत आहेत. याची प्रशासनानं गंभीर दखल घ्यावी.
अशी मागणी आर के शैक्षणिक व सामाजिक फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आकाश शामराव बुचडे रा.माळवाडी ता.पलूस यांनी पोलीस अधीक्षक , सांगली व पोलीस ठाणे भिलवडी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆