======================================
======================================
कुंडल | दि. १९ मार्च २०२३
--------------------------------------------------------------------
कर्त्या पुरुषाच्या निधनानंतर उध्वस्त होणाऱ्या कुटुंबांना सावरण्यासाठी "शरद आत्मनिर्भर" काम करते आहे. शासन फक्त घोषणा करत आहे पण आपण कृतीतून या कुटुंबांना पुन्हा उभे करत असल्याचे प्रतिपादन आमदार अरुणअण्णा लाड यांनी केले.
कुंडल (ता.पलूस) येथे " शरद आत्मनिर्भर" योजनेतून पलूस कडेगाव तालुक्यातील १०४ निराधार कुटुंबांना स्वयंरोजगाराचे साहित्य वाटपचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
यावेळी आमदार लाड म्हणाले, स्पर्धेच्या युगात निराधार कुटुंबांनी उभं राहताना आपली मुलं हीच संपत्ती समजून सुसंस्कारित पिढी घडवा त्यासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. शरदभाऊ लाड यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना सायकीलींचे वाटप करण्याचा संकल्प सोडला आणि त्याला लोकांमधून भरभरून प्रतिसाद ही मिळाला अशाच लोकाभिमुख चळवळी राबवून क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी. बापूंचा विचार समाजात रुजवण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी शरद आत्मनिर्भरच्या अध्यक्षा धनश्रीताई लाड म्हणाल्या, निराधारांना आधार हा संकल्प सोडला आहे त्यामुळे कायमस्वरूपी ही संकल्पना राबविली जाणार आहे. कुठल्याही निराधार कुटुंबाला नेहमी मदतीला क्रांती कुटुंब उभा असेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी सीमा लाड(कुंडल), उषा साळुंखे(पलूस), जान्हवी शिंदे (खंडोबाचीवाडी), मालन पाटील (पुनदी), राधिका सुतार (सावंतपूर), पूजा रावळ (पलूस), सिंधुताई कांबळे (आंधळी), या महिलांनी जड अंतःकरणाने आपल्यावर ओढवलेल्या संकटात "शरद आत्मनिर्भर" योजनेमुळे मिळालेला हातभार आणि उभा राहत असलेल्या कुटुंबामुळे आभार मानले.
कार्यक्रमाचे स्वागत सुरेश शिंगटे यांनी केले, प्रास्ताविक दीपक मदने यांनी केले तर आभार वैशाली मोहिते यांनी मानले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले, पलूस तालुकाध्यक्षा नंदा पाटील, कडेगाव तालुकाध्यक्षा वैशाली मोहिते, पी.एस.माळी, आनंदराव निकम, जनार्दन पाटील, दीपक मदने, यांचेसह पलूस कडेगाव तालुक्यातून हजारो नागरिक उपस्थित होते.
आधार गेल्यावर सगळं मोडून पडले असे वाटत असताना शरदभाऊ आणि धनश्रीताईंनी मदतीचा हात दिला म्हणूनच आम्ही आज ताठ मानेने समाजात वावरत आहोत हे आमच्यासाठी विठ्ठलरुक्मिणी समानच आहेत असे भावुक उद्गार महिलांनी यावेळी काढले.
"शरद आत्मनिर्भर" योजनेतून पलूस-कडेगाव तालुक्यातील निराधार कुटुंबांना स्वयंरोजगार साहित्य वाटप करताना आमदार अरुणअण्णा लाड, धनश्रीताई लाड, नंदा पाटील, वैशाली मोहिते आदी.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆