शाहूवाडी तहसीलवर स्वाभिमानीचा मोर्चा
VIDEO
👇
👇
=====================================
=====================================
कोल्हापूर/शाहूवाडी | दि. २३ मार्च २०२३
--------------------------------------------------------------------
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मंगळवारी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शाहूवाडी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
दुपारी दीड वाजता मलकापूर येथील विठ्ठल मंदिरापासून मोर्चास सुरुवात झाली. हा मोर्चा तहसील कार्यालयावर येऊन धडकला. हा मोर्चा तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
खासदार राजू शेट्टी यांचा जनता दरबार
खासदार राजू शेट्टी यांनी शाहुवाडी तालुक्याचे तहसीलदार, वनविभागाचे अधिकारी तसेच एम एस सी बी चे अधिकारी यांना जनतेसमोरच उभा करून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावयास लावली.
यावेळी समाधानकारक उत्तरे न दिल्याने तहसीलदार गुरू बिराजदार, महावितरणचे ए. ए. शामराज, वनविभागाचे वन क्षेत्रपाल नंदकुमार नलवडे, अमित भोसले या
अधिकाऱ्यांना खासदार राजू शेट्टी यांनी धारेवर धरले.
यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, भाई भारत पाटील, सघटनेचे सचिव राजेंद्र गड्यानवर, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, अजित पवार, सुरेश म्हाऊटकर आदींची भाषणे झाली. मागण्यांचे निवेदन तहसीलदार गुरू बिराजदार यांना दिले. मोर्चामध्ये सौरभ शेट्टी, सुरेश म्हाऊटकर, वसंत पाटील, सागर कोंडेकर, अजित पवार, संदीप राजोबा, जयसिंग पाटील, राजाराम मगदूम, भैया थोरात, राजू वडाम यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆