उद्यापासून संपावर असलेले सर्व कर्मचारी कामावर हजर राहणार
==============================
मुंबई | दि. २० मार्च २०२३
------------------------------------------------------
मुंबई दि.२० ; गेल्या सात दिवसांपासून राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि अन्य अधिकाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मुख्य मागणी कर्मचाऱ्यांची होती. यासंदर्भात संपकऱ्यांची राज्य सरकारशी चर्चा झाली.त्यात सरकारने ही योजना लागू करण्याबाबत सकारात्मकता दाखविली आहे. त्यामुळे आजपासून संप मागे घेत असल्याची घोषणा कर्मचारी समन्वय समितीने जाहीर केले आहे.
संपावरील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी उद्यापासून कामावर हजर व्हावे, असे आवाहन समन्वय समितीने जाहीर केले आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆