yuva MAharashtra " एक तास शाळेसाठी " या उपक्रमाअंतर्गत " द जनशक्ती न्यूज " तर्फे शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप..

" एक तास शाळेसाठी " या उपक्रमाअंतर्गत " द जनशक्ती न्यूज " तर्फे शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप..



====================================
====================================

भिलवडी | दि. 05 मार्च 2023

पलूस तालुक्यातील भिलवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांना " द जनशक्ती न्यूज " चे मुख्य संपादक, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब रुपटक्के यांच्यातर्फे शनिवार दि. ०४ मार्च रोजी सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून  खाऊचे वाटप करण्यात आले.
  शैक्षणिक गुणवत्ता, शाळेचा पट,परिसराची स्वच्छता, शाळेची सुसज्ज इमारत,सर्वगुणसंपन्न शिक्षक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्थानिक नागरिकांचे शाळेच्या बाबतीत असलेले प्रेम यामुळे भिलवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे नाव गेल्या काही वर्षांत परिसरासह तालुक्यात प्रसिद्ध होते.
आजरोजी शाळेचा पट अतिशय कमी आहे. शाळा खुप सुंदर आहे. शिक्षक चांगले आहेत. शाळेची सुसज्ज इमारत आहे. शाळा डेव्हलपमेंट साठी ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे. हि शाळा भिलवडीच्या सुप्रसिद्ध कृष्णा घाटाजवळ आहे. या शाळेत घडलेले विद्यार्थी आज क्लासवन अधिकारी , डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक,प्राचार्य, जज ,वकील ,शिक्षक ,पोलीस, आर्मी, उद्योजक आहेत. अशा पद्धतीने अनेकांना यशस्वी बनविण्याचे काम या शाळेने केले आहे. परंतु कालांतराने या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.  
आजरोजी या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या गावाच्या लोकसंख्येच्या मानाने खुपच कमी आहे. 
" पूर्वीची शाळा आणि आत्ताची शाळा " यामध्ये फारच मोठा बदल घडला आहे.
या शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल घडवायचे असेल तर स्थानिक नागरिकांनी या शाळेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
आजरोजी या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे अतिशय गरिब व सामान्य कुटुंबातील आहेत.यासाठी भिलवडी येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते यांनी " एक तास शाळेसाठी " हा उपक्रम चालू केला आहे. शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर उपक्रम प्रत्येक शनिवारी शाळेमध्ये राबविण्यात येत आहेत. 

या उपक्रमाअंतर्गत काल शनिवार दि. ०४ मार्च रोजी सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून  सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब रुपटक्के ( " द जनशक्ती " मुख्य संपादक ) यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला. " द जनशक्ती " न्यूज चे सदस्य ईनामुल सुतार यांच्या सह उपस्थितीत पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांचे हस्ते खाऊचे वाटप करण्यात आले.

दरम्यान व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुबोध वाळवेकर यांनी मुलांना योगासने आणि सूर्यनमस्कार शिकवले.
त्याचबरोबर पुढील महिन्यात होणाऱ्या परीक्षा लक्षात घेता मन एकाग्र राहण्यासाठी योगासने किती महत्त्वाची आहेत याची माहिती त्यांनी मुलांना समजेल अशा भाषेत दिली.त्यांनी मुलांचा उत्साह वाढवलाच याचबरोबर शाळेसाठी योगदान देण्याचीही यावेळी बोलताना त्यांनी ग्वाही दिली.


या उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील , पत्रकार  चंद्रमणी रांजणे, सुरज शेख , अमोल वंडे यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
 यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. 

◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆◆◆◆◆◆








◆●◆●◆●◆●◆●◆●◆◆◆◆◆◆◆◆◆●◆●◆●◆●◆