yuva MAharashtra कर्नाळ येथील टायर चोरी प्रकरणातील आरोपी जेरबंद..

कर्नाळ येथील टायर चोरी प्रकरणातील आरोपी जेरबंद..


==============================

==============================

सांगली | दि. २९ मार्च २०२३

-----------------------------------------------------



  सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील कर्नाळ ता.मिरज येथे दि.२७.०३.२०२३ रोजी बीव्हिजी इंडिया लिमीटेड या वैद्यकिय मदत पुरविणारी १०८ ॲम्बुलन्सची देखभाल व दुरुस्तीचे सर्व्हिस स्टेशन मधुन १०८ ॲम्बुलन्सच्या ५८,०३६/- रुपये किंमतीच्या नविन ११ टायर व टयुब चोरी झाल्याबाबत दि.२७.०३.२०२३ रोजी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
या अनुषंगाने सांगली ग्रामीण पोलीसांनी 
सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन त्याला जेरबंद केले आहे.
आकाश रामा गगनमल्ले, वय २२ वर्षे,  रा. विठ्ठल नगर कर्नाळ,ता.मिरज जि. सांगली असे आरोपीचे नांव असून त्याच्या ताब्यातील ५२,५३६/- रु. किंमतीचे ११ जे के ब्रुट २१५/७५ आर १५, १० पीआर कंपनीचे एकुण ११ टायर किंअं.व ५,५००/- रु. किंमतीचे जे के ब्रुट २१५/७५ आर १५ कंपनीचे ११ ट्युब किंअं. असा एकूण ५८,०३६/- रु. किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अशी माहिती सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी दिली आहे.
सदरची कारवाई मा. बसवराज तेली, पोलीस अधीक्षक, सांगली व श्री अजित टिके, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग, सांगली यांचे मार्गदर्शनाखाली 


सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड,  पोलीस उप-निरीक्षक किरण मगदुम, सहा. पोलीस फौजदार धनंजय चव्हाण, पोलीस हेडकॉन्स्टेबल रमेश कोळी, पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष माने, पोलीस नाईक सचिन  , यांनी केलेली आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆