=====================================
=====================================
भिलवडी | दि. 18 एप्रिल 2023
बी सी सी आय अंतर्गत होणाऱ्या 16 वर्षाखालील विजय मर्चंट क्रिकेट स्पर्धेसाठी पलूस तालुक्यातील भिलवडी गावचे सुपुत्र सांगली जिल्ह्याचे क्रिकेट प्रशिक्षक विजय वावरे यांची 16 वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षक पदी नियुक्ती झाली. गेल्याच महिन्यात ते बी सी सी आय लेवल - 1 क्रिकेट प्रशिक्षक होवून बी सी सी आय लेवल - 2 साठी पात्र ठरले होते. गेली 10 वर्षे ते ग्रामीण भागातील मुलांना भिलवडी येथील स्वताच्या क्रिकेट अकॅडमी मध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण देत आहेत.
या अगोदर त्यांनी सांगली जिल्ह्याचे मुख्य प्रशिक्षक तसेच सिलेक्टर म्हणून काम केले आहे. ग्रामीण भागात काम करत त्यांनी जे यश संपादन केले त्या बद्दल ग्रामीण भागातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
विजय वावरे यांना सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार संजय बजाज यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
तसेच ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक सागर पेंडूरकर ही वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करत आहेत.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆