======================================
======================================
कुंडल | दि. २४ एप्रिल २०२३
--------------------------------------------------------------------
कुंडल (ता.पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम 2023-24 या 21 व्या गाळप हंगामाचा तोडणी-वाहतूक करारांचा शुभारंभ कार्यक्रम कारखान्याचे अध्यक्ष आमदार अरुणअण्णा लाड यांच्या हस्ते पार पडला. यावेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, कार्यकारी संचालक सी.एस.गव्हाणे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी आमदार अरुणअण्णा लाड म्हणाले, यंदा कारखान्याचे विस्तारीकरण पूर्ण झाले आहे येत्या गाळप हंगामात 12 लाख मेक्ट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दीष्ठ धरले आहे यासाठी 15 हजार हेक्टर क्षेत्राची नोंद आवश्यक आहे. यावर्षी ऊसाचे क्षेत्रही पुरेसे आहे.
तोडणी यंत्रणेची होणारी फसवणूक टाळण्यासाठी कारखान्याने गोपीनाथ मुंडे महामंडळाकडे त्यांचे नोंदणी शुल्क भरून नोंदणी केली आहे, साखर संघाच्या असलेल्या नियमांप्रमाणेच मुकदमांना उचल द्यावी, मुकादमांशी करार करताना तोंडी न करता रीतसर करावेत म्हणजे भविष्यात जर फसवणूक झाली तर न्यायालयात दाद मागता येईल.
यंदाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांनी प्रती कोयता योग्य रक्कम पुढे द्यावी कि जेणे करुन ती पुर्ण फिटेल आणि तोडणी कामगार वेळेत आपल्याला उपलब्ध होतील याची दक्षता ही घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
क्रांती कारखान्याने अनेक ऊस विकास सुविधा राबविल्यामूळे कारखान्याचे एकरी उत्पादन वाढले आहे. कार्यक्षेत्रामध्ये 52 टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावर ठिबक सिंचन प्रणाली बसविण्यात आली आहे. कारखाना इतर सर्व देणी वेळेत देत आला आहे. सर्व वाहतूक कंत्राटदारांनी करार लवकरात लवकर पुर्ण करुन या हंगामात चांगल्या प्रतिचा ऊस गाळपास आणावा कि जेणे करुन कारखान्याचा त्या अनुशंगाने शेतक-यांचाही फायदा साधता येईल.
यावेळी कारखान्याचे शेती अधिकारी दिलीप पार्लेकर म्हणाले, आजअखेर 10 हजार 500 हे. ऊस नोंद कारखान्याकडे झाली आहे. अद्याप ज्या शेतक-यांनी ऊस नोंद केला नाही त्यांनी लवकरात लवकर नोंद घालावी. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात करार शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी.एस.गव्हाणे यांनी केले, आभार सचिव आप्पासाहेब कोरे यांनी मानले.
यावेळी संचालक जयप्रकाश साळुंखे, जयवंत कुंभार, कुंडलिक थोरात, शीतल बिरणाळे, अंकुश यादव, पोपट संकपाळ, संदीप पवार, कार्यकारी संचालक सी.एस.गव्हाणे, कारखान्याचे सर्व संचालक, वाहतूक कंत्राटदार आणि कर्मचारी उपस्थित होते.
क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सह.साखर कारखान्याचा तोडणी-वाहतूक कंत्राटदारांचा करार शुभारंभ करताना कारखान्याचे अध्यक्ष अरुणअण्णा लाड, किरण लाड, सी एस गव्हाणे, दिलीप पार्लेकर आदी
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
https://youtube.com/@thejanshakatinews5707
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆