व्हिडीओ
👇
=====================================
=====================================
सांगली | दि. 21 एप्रिल 2023
देशात वाढत चाललेली महागाई कमी करा , जातिधर्मामध्ये सामाजिक सलोखा राखणारे "मोहमद पैगंबर बिल" पारित करून तात्काळ कायद्यात रूपांतरित करा या प्रमुख मागणीसह अन्य मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आद.ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली, वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीने, सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ,
भारत सरकारने तसेच महाराष्ट्र राज्य शासनाने जिवन आवश्यक रोजच्या दैनंदिन जीवनात वापरण्यात येणाऱ्या गरजेच्या वस्तूंवर GST टॅक्स लावून सर्वसामान्य जनता तसेच गोरगरीब कष्टकरी कामगार वर्गाला सुखाने जगणे मुश्किल केलेले आहे .
खाद्यपदार्थांवर ही GST लावण्यात आली आहे ही बाब डिजिटल इंडिया ला लाजवणारी बाब म्हणावे लागेल.
कारण, भारत देशातील सर्वसामान्य तसेच कष्टकरी नागरीक हा दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमध्ये होळपळून निघत आहे. शेतकरी बांधवांना त्यांनी आपल्या कष्टाने पिकविलेल्या धान्य व भाजीपालेला योग्य भाव मिळत नाही.
तसेच सध्या 40 ते 45 सेल्सिअस तापमानात शेतमजूर तसेच विट कामगार, श्रमिक कष्टकरी कामगार यांना त्यांच्या केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळत नाही.त्यांना या वाढत्या महागाईत आपले जीवन कठीण खडतर परिस्थितीत जगण्यास भाग पडत आहे.
तसेच देशात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत, परंतु सध्या जाती धर्माच्या नावाखाली जातीजाती धर्माधर्मा मध्ये तेढ, जातीय दंगल निर्माण करण्याचे काम काही धर्मांड शक्ती मोठ्या प्रमाणात काम करीत आहे. सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी तसेच शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेला मसुदा, शिक्षक आमदार मा.कपिल पाटील यांनी महाराष्ट्र विधीमंडळात मांडलेले "मोहमद पैगंबर बिल" तात्काळ विधीमंडळात पास करून कायद्यात रूपांतरित करावे.व सर्व धर्मांच्या लोकांना कायदेशीर संरक्षण देण्यात यावे. म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडी, सांगली जिल्हा मार्फत झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्र व राज्य शासनाला जागे करण्यासाठी खालील प्रमाणे भारतीय जनतेला आवश्यक असणाऱ्या मागण्या करीत आहोत.
व्हिडीओ
👇
प्रमुख मागण्या -
१) घरगुती गॅस, व्यावसायिक गॅस सिलेंडरचे तात्काळ दर कमी करावेत.२) जीवन आवश्यक सर्व धान्यावरील तसेच खाद्यपदार्थावरील GST टॅक्स कायमपणे बंद करण्यात यावे.३) विद्युत वितरण कंपनीने वाढीव दराने बिलाची आकारणी केली आहे ते ताबडतोब रद्द करावे. वाढीव शुल्क कमी करावा.४) खाद्यतेलाचे दर कमी करून ते कायमपणे नियमितपणे करावे.५) बिहारच्या धर्तीवर संपूर्ण देशात ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी६) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेले बिल शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी महाराष्ट्र विधीमंडळात मांडलेले मोहमद पैगंबर बिल तात्काळ विधीमंडळात पास करून कायद्यात रूपांतरित करावे७) मोलमजुरी, शेतमजूर, रस्ते कामगार, गवंडी, हॉटेल कामगार, धुणीभांडी करणाऱ्या श्रमजीवी वर्गाची मजुरी महागाई निर्देशांकानुसार निश्चित करण्यात यावी.८) खाजगी शिक्षण क्षेत्राला उत्तेजन न देता जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकाच्या शाळांचा विकास करून आधुनिकीकरण करण्यात यावे जेणेकरून गोरगरिबांच्या मूलामुलींना चांगल्या दर्जाचे शिक्षण घेऊ शकतील९) रेशन दुकानात मिळणारे निकृष्ट धान्याचा दर्जा हे चांगल्या प्रतीचे धान्य मिळावे.१०) SC/ST/NT/OBC च्या शैक्षणिक योजनांमध्ये भरीव आर्थिक तरतूद करण्यात यावी.११) सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात, विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजेच "मौजे अंकलखोप" येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी समाज बांधवांनी जतन केलेल्या आहेत. समाज कल्याण विभाग मार्फत "अस्थी स्मारक " निधी नियोजन केले आहे परंतु अनेक दिवसांपासून स्मारक बांधण्यास दिरंगाई होत आहे. ताबडतोब स्मारकाचे बांधकाम सुरू करण्यात यावे.वरील प्रमाणे जनतेच्या हिताचा मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अन्यथाआद.ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली, वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीने, संपूर्ण महाराष्ट्रात केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विरोधात लोकशाही मार्गाने लढा उभारला जाईल याची प्रामुख्याने नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला.
व्हिडीओ
👇
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, जिल्हासंघटक संजय कांबळे, जिल्हासदस्य किशोर आढाव, भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर,सरचिटणीस रतन तोडकर, कोषाध्यक्ष संजय कांबळे, परशुराम कांबळे, मानतेश कांबळे, विशाल धेंडे, मंगल माने, नंदा ढाले, अनुसया तोडकर, चारुता कांबळे, सुवर्णा सद्गुने, संपदा कांबळे, पुनम नाडे, शोभा मदने, माधुरी भोसले, तेजश्री मोहिते, अनिता बुधाले यासह बहुसंख्य महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆