=====================================
=====================================
भिलवडी | दि. २१ एप्रिल २०२३
मिरज शहरातील लक्ष्मी मार्केट परिसरातील हनुमान मंदिरामध्ये मुर्तीची विटंबना केल्याची घटना बुधवार दि.१९ रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलीसांनी संशयित मनोरूग्ण महिलेला ताब्यात घेतले आहे.
या घटनेच्या निषेधार्थ भिलवडी , माळवाडी सह परीसरातील गावातील दुकाने गुरुवार दि.२० रोजी सकाळपासून बंद ठेवण्यात आली. त्या बंदला सर्व व्यापारी व नागरीकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
यावेळी भिलवडी , माळवाडी सह परीसरातील व्यापारी यांनी आपली दुकाने दिवसभर पूर्णपणे बंद करून या बंदमध्ये उस्फूर्त सहभाग दर्शविला.
बंदला सर्व गावातील विविध व्यापारी संघटना यांनी पाठिंबा दर्शवून मोठ्या प्रमाणात एकजूट दाखवली. एकंदर पाहता कालचा बंद शंभर टक्के यशस्वी झाला.
माळवाडी मुख्य चौकात शुकशुकाट
👇
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆