=====================================
=====================================
सोलापूर | दि. १० एप्रिल २०२३
(सोलापूर जिल्हा प्रतिनिधी - संजय शिंदे)
बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी संघाच्या वतीने पुणे येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये सोलापूरचे उद्योजक व समाजसेवक रवींद्र गोयल यांना सन २०२३ चा राज्यस्तरीय आदर्श समाज भूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहामध्ये लक्ष्मणराव लटपटे, भटके विमुक्त मोर्चा महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, आ. तोताराम कायंदे, संघाच्या अध्यक्षा लक्ष्मी गरकळ यांच्या उपस्थितीत गोयल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
उद्योजक, माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटना, राष्ट्रीय स्तरावर इंटरनॅशनल ह्युमन राईट असोसिएशन , सोलापूर पोलीस आयुक्तालय शांतता कमिटी सदस्य, सद्गुरु उद्दिष्ट सामाजिक संस्था अशा विविध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेली दहा वर्षे ते समाजसेवेत आहेत. गोरगरीब व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात . याआधी २०२२ मध्ये त्यांना वसंत सोशल फाउंडेशन यांच्या क्रांतिवीर वसंतराव नाईक या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते .
बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी संघाच्या वतीने पुणे येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये सोलापूरचे उद्योजक व समाजसेवक रवींद्र गोयल यांना सन २०२३ चा राज्यस्तरीय आदर्श समाज भूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆