yuva MAharashtra अंकलखोप येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नियोजित मंजूर स्मारक तातडीने पूर्ण करा ; वंचित बहुजन आघाडीची मागणी

अंकलखोप येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नियोजित मंजूर स्मारक तातडीने पूर्ण करा ; वंचित बहुजन आघाडीची मागणी





======================================
======================================

सांगली | दि. ०४ एप्रिल २०२३

स्थानिक प्रशासन व जिल्हा प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असलेले   अंकलखोप येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नियोजित मंजूर स्मारक तातडीने पूर्ण करावे अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

सांगली जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या,  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने तसेच ऐतिहासिक सभेने पावन झालेल्या पलूस तालुक्यातील अंकलखोप या गावी येथील समाज बांधवांनी १९५६ साली महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणा 
नंतर त्यांच्या पवित्र अस्थींचे जतन केले आहे.


या ठिकाणी ग्रामपंचायत अंकलखोप यांनी दिवाबत्ती व सुशोभीकरणाची व्यवस्था केली नसल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांचे अस्थी कलश स्मारक हे अंधारात उभे राहिले आहे.त्यांच्या अस्थींचे पावित्र्य जपण्यात स्थानिक प्रशासनासह जिल्हा प्रशासन असमर्थ ठरले असून,या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सोयी उपलब्ध नसल्याने भीम अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या आ़़हेत.

महाराष्ट्र शासन, समाज कल्याण विभाग यांच्या मार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कोट्यवधीं रूपयांचा खर्च केला जातो, परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी, शासनाच्या अभिप्रायासाठी वाट पाहावी लागत आहे. ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब म्हणावे लागेल, जर समाज कल्याण विभाग तसेच जिल्हा प्रशासनाकडे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक, अस्थी, पुतळ्याची सुरक्षा व पावित्र्य राखण्यासाठी व्यवस्था अथवा मौजे अंकलखोप ग्रामपंचायत देखभाल दुरुस्ती कामासाठी तयार नसल्यास विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभा शाखा सांगली जिल्हा,हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तसेच स्मारक आणि पवित्र अस्थींची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी घेण्यास पूर्णपणे तयार आहे.त्यामुळे कोणतेही कारण पुढे न करता स्मारक व पुतळा उभारण्याच्या कामाची वर्क ऑर्डर काढुन, संबंधित विभागाने तातडीने काम पुर्ण करावे अन्यथा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल युनियन यांच्या मार्फत लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन उभा करावे लागेल व होणाऱ्या नुकसानीला जिल्हा प्रशासन तसेच महाराष्ट्र राज्य शासन जबाबदार राहील  याची गांभिर्याने नोंद घ्यावी. अशा आशयाचे निवेदन सांगली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.


यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे सर,कोषाध्यक्ष हिरामण भगत, मेजर कुमार कांबळे,मेजर गौतम होवाळे, ऋषिकेश माने,  मानतेश कांबळे, मऱ्याप्पा राजरतन, दीपाली वाघमारे,पवन वाघमारे, अनिल गाडे, युवराज कांबळे, योगेश कांबळे, जावेद आलासे, संगाप्पा शिंदे, इमरान बेपारी, संदीप कांबळे, किरण माने, हर्षवर्धन कांबळे यांच्या बरोबर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆