पालखी सोहळा व्हिडीओ
👇
=====================================
=====================================
भिलवडी | दि. ०६ एप्रिल २०२३
पलूस तालुक्यातील धनगांव येथे ग्रामदैवत हनुमान जयंती विविध भव्यदिव्य कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.दिवसभर हजारो भाविकांनी रांगेत येऊन दर्शन घेतले.
पहाटे ह. भ. प. पोपट माने महाराज यांचे जन्मकाळाचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले.यानंतर बजरंग बली की जय चा गजर करीत पुष्वृष्टी करण्यात आली.सुवासिनींनी पाळणा गायिला.व्यासपीठ चालक ह.भ.प.श्रीपती माने यांच्या सह सर्व वाचकांच्या उपस्थिती मध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता करण्यात आली.सरपंच सतपाल साळुंखे,यात्रा कमिटीची अध्यक्ष संदीप यादव आदींच्या हस्ते आंब्याचे झाड देऊन सर्व पारायण वाचकांचा सत्कार करण्यात आला.
सायंकाळी मानकरी पाटील परिवरांनी सवाद्य मिरवणूकीसह साखर पेढे मंदिरात आणून भाविकांना वाटप केले. बैंड,डॉल्बी,आकर्षक आताषबाजी व गुलालाची उधळण करीत गावातून सवादय पालखी मिरवणूक काढण्यात आली.मंदिरात दर्शन घेण्यासाठी दिवसभर भाविकांनी
हजारोंच्या संख्येने गर्दी केली.उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆