=====================================
=====================================
कुंडल | दि. २१ एप्रिल २०२३
शरद फाउंडेशन संचिलीत शरद आत्मनिर्भर अभियान पलूस कडेगाव मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अंकलखोप (ता.पलूस) येथे जिल्हा परिषद गटामध्ये रक्तदान शिबीर पार पडले या शिबीराचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य शरदभाऊ लाड यांचे हस्ते झाले.
यावेळी शरद लाड म्हणाले, दर महिन्याला अशा पद्धतीचे रक्तदान शिबीर आयोजित करून रक्ताचा तुटवडा भासून देणार नाही तसेच कोणालाही रक्ताची आवश्यकता असेल त्यांना यामध्यमातून रक्ताचा पुरवठा केला जाईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले, उमेश जोशी, शीतल बिरनाळे, सतीश पाटील, मोहन पाटील, सतीश चौगुले, पोपट फडतरे, विश्वनाथ मिरजकर,सचिन जाधव, अंकुश पाटील, विनोद पानबुडे, अर्जुन जाधव, विशाल जाधव,नागेश पाटील, विनायक महाडीक, पूजा लाड, शरद साळुंखे, प्रदीप साळुंखे, ज्ञानेश पाटील, इंद्रजित पवार यांचेसह रक्तदाते, मान्यवर उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆