yuva MAharashtra "भीम प्रतिष्ठान"च्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण तेविसावे वर्ष ; विविध क्षेत्रातील गुणीजनांचा गौरव

"भीम प्रतिष्ठान"च्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण तेविसावे वर्ष ; विविध क्षेत्रातील गुणीजनांचा गौरव



=====================================
=====================================

सोलापूर | दि. ०९ एप्रिल २०२३

(सोलापूर जिल्हा प्रतिनिधी - संजय शिंदे)

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन पुढे निघालेल्या येथील "भीम प्रतिष्ठान"च्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण मोठ्या उत्साहात करण्यात आले. या पुरस्कारांचे हे २३ वे वर्ष आहे.
   मराठा सेवा संघाचे माजी प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. माजी आमदार नरसिंग मेंगजी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह रजपूत, जैन श्वेतांबर स्थानकवासी संघाचे अध्यक्ष पद्म राका, क्रेडाईचे राजेंद्र शहा-कांसवा, डॉ. रावसाहेब पाटील, प्रतिष्ठानचे संस्थापक बाबा बाबरे, अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी विचारांचा जागर झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने जागर करण्याचे काम बाबा बाबरे करीत असल्याचे प्रतिपादन नेताजी गोरे यांनी केले तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुरू करण्याचा सल्ला प्रदीपसिंह रजपूत यांनी यावेळी दिला. २३ वर्षे या पुरस्कारांचे सातत्य कायम असल्याबद्दल सर्वच वक्त्यांनी आपल्या भाषणात प्रतिष्ठानचे अभिनंदन केले.
   वीरेंद्र हिंगमिरे यांनी प्रास्ताविक केले. बाबा बाबरे यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती देऊन सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर ऍड. विशाल मस्के यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  प्रभाकर बाबरे, वैभव लोखंडे, सोनू माने, सिद्धार्थ बाबरे, अजय गायकवाड, किरण गायकवाड, अकबर शेख आदींनी परिश्रम घेतले.
                    
                         यांचा झाला सन्मान :
मोहन तलकोक्कूल (सामाजिक कार्यकर्ता), हुसेन बागवान (कामगार), डॉ. वनिता सावंत (शिक्षण), डॉ. नूरखान सैफन खान, मधुकर गवळी (विशेष गौरव), कु. साधना भोसले (क्रीडा), चंद्रकांत मिराखोर (पत्रकारिता), डॉ. दशरथ रसाळ, डॉ. जिलानी नूरखान खान, डॉ. आफ्रा जिलानी खान (विशेष सन्मान). कु. साधना भोसले हिच्या वतीने तिच्या मातोश्री कल्पना भोसले यांनी पुरस्कार स्वीकारला.



"भीम प्रतिष्ठान"च्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण प्रसंगी नेताजी गोरे, नरसिंग मेंगजी, प्रदीपसिंह रजपूत, बाबा बाबरे, वीरेंद्र हिंगमिरे, पद्म राका, राजेंद्र कांसवा, डॉ. रावसाहेब पाटील, पुरस्कार विजेते व मान्यवर.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆