=====================================
=====================================
पलूस वार्ताहर : दि २३ मे २०२३
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांची आय. एल. अँड एफ. एस. अर्थात इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस संबंधित कथित गैरव्यवहाराशी कोणताही संबंध नसतांना त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच ईडीकडून नोटीस पाठवून सोमवारी त्यांची तब्बल साडेनऊ तास चौकशी करण्यात आली. त्या निषेधार्थ
पुणे पदवीधर आमदार मा.अरूण आण्णा लाड व जि.प.गटनेते मा.शरद भाऊ लाड.यांच्या नेतृत्वाखाली पलूस येथील जनसंपर्क कार्यालयाच्या समोर पलूस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. अशी माहिती युवक राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष इंद्रजित पवार यांनी दिली.
यावेळी,
विनायक महाडिक , इंद्रजित पवार ,नंदा ताई पाटील , विलास पाटील , विजय पवार , गोरख सूर्यवंशी , स्वप्नील पाटील , प्रतीक पाटील , अभिजित सांडगे , राहुल जगताप , स्वप्नील पाटील , मोहित यशवंत , राजेंद्र रुपटक्के , रणजित बगल , विनोद पणबुडे , पलूस तालुक्यातील सर्व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆