किर्लोस्कर कुटुंबातील प्रसिद्ध उद्योगपती संजय किर्लोस्कर यांचा सन्मान..
सांगली , वार्ताहर : दि. २७/५/२०२३
--------------------------------------------------------------------
सांगली : किर्लोस्कर कारखान्याच्या माध्यमातून परिसरातील हजारो कुटुंबांना आधार देणाऱ्या किर्लोस्कर कुटुंबातील प्रसिद्ध उद्योगपती व किर्लोस्कर ब्रदर्स चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री संजय किर्लोस्कर यांच्या बाणेर, पुणे येथील प्रधान कार्यालयात सहकुटुंब सदिच्छा भेट घेऊन कृष्णा येरळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व मगदुम मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक, सांगली चे डॉ. दिलीप मगदूम यांनी घोंगडे आणि स्वता शब्दबद्ध केलेले सन्मानपत्र देऊन कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी बोलताना डॉ. मगदूम म्हणाले की, आमचे वडील बजरंग मगदूम हे किर्लोस्कर कारखान्यात ३३ वर्षे सेवेत होते. किर्लोस्कर कारखाना व किर्लोस्कर कुटुंब हे आमच्या व परिसरातील हजारो कुटुंबांचा हिस्सा आहे. किर्लोस्कर कारखान्यात हजारोजणांना नोकरी दिली. शिवाय औद्योगिक वसाहतीतील शेकडो व्यवसायिकानाही त्यांनी व्यवसाय उपलब्ध करून दिले. हजारो कुटुंबांच्या यशस्वी वाटचालीमध्ये किर्लोस्करांचे अनन्यसाधारण स्थान आहे. त्यांच्यासाठी शब्दबद्ध केलेल्या माझ्या भावना त्यांना प्रत्यक्ष भेटून दिल्या. केवळ पलूस तालुक्यातील किर्लोस्करवाडीच नव्हे तर सांगली जिल्ह्याचे नाव किर्लोस्कर ब्रदर्समुळे जगभर झाले आहे. या कुटुंबाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सहकुटुंब उद्योगपती संजय किर्लोस्कर यांची भेट घेऊन त्यांना सन्मानपत्र दिले.
कृष्णा येरळा प्रतिष्ठानतर्फे उद्योगपती संजय किर्लोस्कर यांचा गौरव करताना डॉ. दिलीप मगदूम.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆