yuva MAharashtra सांगली पलूस ग्रामिण एस टी बसच्या फेऱ्या वाढवा.. माळवाडी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी..

सांगली पलूस ग्रामिण एस टी बसच्या फेऱ्या वाढवा.. माळवाडी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी..


पलूस आगार प्रमुखांना निवेदन..


======================================
======================================

भिलवडी : वार्ताहर

  सांगली पलुस (भिलवडी मार्गे) जाणाऱ्या ग्रामिण एस टी बसच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात या बाबतचे निवेदन  माळवाडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने   पलुस आगार प्रमुख यांना देण्यात आले.  अशी माहिती पलूस तालुका सामाजिक सेलचे अध्यक्ष मनिष मोरे यांनी दिली.


     सध्या सगळीकडे लग्न सोहळ्याचा सिझन सुरू आहे. त्यातच शालेय सुट्या यामुळे वाहतुकिवर प्रचंड ताण आहे , सांगली हे जिल्ह्याचे  तर पलूस हे तालुक्याचे ठिकाण असून दोन्ही शहरातील अंदाजे अंतर ३५ ते ४० कि.मी.आहे. 
प्रवाशांच्या वेळेत बसेस नसणे, वाढलेली खासगी प्रवाशी वाहतूक यामुळे माळवाडी व भिलवडी येथून पलूस व सांगलीकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विशेष करून लहान मुले, वयोवृद्ध  महिलां पुरुष यांची गैरसोय होत आहे.

शहरी बसच्या फेऱ्या कमी असल्याने  वेळेत बसेस नसणे यामुळे प्रवाशांना अक्षरशः तीन तीन तास बसथांब्यावर ऊन्हात ताटकळत बसावे लागत आहे.
 
सांगली ते पलूस या मार्गावर एस टी बसने  प्रवास करणाऱ्या महिला व वयोवृद्धांना हाफ तिकीट सारख्या शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी एस टी महामंडळ प्रशासनाने  सांगली ते पलूस (माळवाडी-भिलवडी मार्गे) जाणाऱ्या ग्रामिण एस टी बसच्या  फेऱ्या तातडीने वाढवून ग्रामीण भागातील लोकांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या  वतीने माळवाडी येथील राष्ट्रवादीचे युवा नेते जवाहर पवार व मनिष मोरे यांनी पलूस एस टी बस आगार प्रमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदरच्या मागणीवरती तातडीने कारवाई न झालेस माळवाडी येथे  सांगली रस्त्यावर लोकशाही मार्गाने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆