======================================
======================================
सांगली : वार्ताहर दि.१२ जून २०२३
सांगली : माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ सांगली जिल्हा कार्यकारिणीची बैठक रविवार दि.११ जून रोजी मिरज येथील शनिवार पेठ येथे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या कार्यालयात उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
यावेळी कार्यकारणीच्या रिक्त पदांवर नियुक्ती करण्याबाबत चर्चा होऊन रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदासाठी पलूस तालुक्यातील माळवाडी येथील धडाडीचे माहिती अधिकार कार्यकर्ते मा.संग्राम बाळू मोटकट्टे तर सचिवपदी भिलवडी येथील धडाडीचे माहिती अधिकार कार्यकर्ते मा.अक्षय भुपाल मोरे यांचे नाव सर्वानुमते पुढे आणण्यात आले. त्याला माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा. सुभाष बसवेकर साहेब यांची संमती घेऊन सदरची नावे अध्यक्ष व सचिव पदावर नियुक्तीसाठी निश्चित करण्यात येऊन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी संग्राम मोटकट्टे तर जिल्हा सचिवपदी अक्षय मोरे यांची निवड करण्यात आली.
उपस्थित सर्व माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी टाळ्याच्या गजरात सदरच्या निवडीबद्दल दोघांचे अभिनंदन केले.
या बैठकीत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ सांगली जिल्ह्याचे यापुढील काम सर्वांच्या विचाराने आणि एकदिलाने करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत अनेक ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
या बैठकीस जिल्हा कार्याध्यक्ष बंडू चौगुले, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीपाल मगदूम, जिल्हा उपाध्यक्ष सुहास साळुंखे, जिल्हा सहसंघटक कुडियर्स गौडर, महापालिका क्षेत्र अध्यक्ष सलीम मुल्ला, उपाध्यक्ष युनुस बागवान, पलूस तालुका प्रचार प्रमुख दत्तात्रय कुलकर्णी, उपसंघटक विष्णू नारायण सुपनेकर, मिरज तालुका मुख्य संघटक निशिकांत तिरमारे, जिल्हा सहसंघटक गुंडोपंत सुतार, जिल्हा मीडिया प्रमुख उदयसिंह राजपूत आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संपूर्ण सांगली जिल्ह्यात तालुका पातळीवर बैठका घेऊन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची गावोगावी मजबूत बांधणी करून महासंघाचे अध्यक्ष मा. सुभाष बसवेकर साहेब यांना बळ देण्याबरोबरच घरोघरी माहिती अधिकाराचे महत्त्व पोहोचवण्याचा संकल्प करून तो पार पाडण्याचा दृढनिश्चय करण्यात आला. यावेळी संस्थापक अध्यक्ष मा. सुभाष बसवेकर साहेब यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून उर्वरित रिक्त पदांवर लवकरात लवकर निवड करून नव्या, चांगल्या विचारांच्या ,स्वच्छ प्रतिमेच्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांना संधी देऊ असे सांगितले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆