yuva MAharashtra तुम्ही जनतेचे सेवक आहात मालक नव्हे ; शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत लेंगरे

तुम्ही जनतेचे सेवक आहात मालक नव्हे ; शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत लेंगरे







=====================================
=====================================

पलूस : वार्ताहर         दि. ०६ जून २०२३

पलूस तहसीलदार यांच्या अनागोंदी भ्रष्ट कारभाराच्या विरोधात जिल्हाप्रमुख आनंदराव बापू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत लेंगरे यांच्या नेतृत्वाखाली,पलूस तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.पलूस पलूस  तहसील कार्यालय मध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे लोकांना नोंदीसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागतात, वरून प्रचंड प्रमाणात पैशाची मागणी तलाठ्यांकडून केले जाते
, तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू मुरूम माती चे अनाधिकृत उत्खनन सुरू आहे.अधिकाऱ्यांच्या हप्ते खोरीमुळे पलूस तालुक्यातील उत्खननाचे प्रमाण जबरी प्रमाणात वाढले आहे. यातून तरुणाई गुन्हेगारी प्रवृत्तीकडे चालत जात आहे सर्वसामान्य नागरिकांचे पैसे दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ अथवा शिबिरे लोकांच्या मार्फत पोहोचवली  जात नाहीत प्रशासकीय अधिकाऱ्यांची उद्धट भाषा आणि लाचखोरी सामान्य लोकांना डोकेदुखी ठरत आहे. म्हणून शिवसेना पलूस तालुका प्रमुख  प्रशांत लेंगरे यांनी तहसील प्रशासनावर विराट मोर्चा काढला यावेळी तहसीलदार ढाणे यांना शिवसैनिकांनी चांगलेच धारेवर धरले यादरम्यान बोलताना लेंगरे म्हणाले की, पलूस तहसील कार्यालयात चाललेला भ्रष्टाचार हा अत्यंत मोठ्या प्रमाणात आहे. कार्यालयात येताना सर्वसामान्य नागरिक अक्षरशः जेलमध्ये येत असल्यासारखे घाबरतात इतका नाहक त्रास भ्रष्ट अधिकाऱ्याकडून नागरिकांना दिला जातोय. कोणतीही परवानगी दिली नसताना अनाधिकृत पणे मुरूम,माती,वाळू मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते सर्वसामान्य नागरिकांच्या नोंदीसाठी प्रचंड पैशाची मागणी केली जाते. अनाधिकृत पणे पैसे घेऊन नोंदी घेतल्या जात आहेत ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.


पलूस तालुक्यातून उत्खननाची कोणतीही परवानगी नसताना अनाधिकृतपणे वाळू , माती , मुरूम याचे उत्खनन होतेच कसे. तालुक्यात असलेल्या वीट भट्ट्या चालतात कशा.? ही गंभीर बाब आहे याचा मी निषेध करतो. 

आम्ही शिवसैनिक आहोत 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही सद्भावना ठेवून लवकरच जिल्हाप्रमुख आनंदराव बापू पवार यांच्यासह मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेऊन या गोष्टीबाबत माहिती देणार आहे.


 लोकांनी नोंदीसाठी, रेशन कार्ड साठी किंवा अन्य प्रशासकीय कामासाठी कोणतेही रक्कम देऊ नये.रक्कम मागितल्यास शिवसेनेची संपर्क साधा असे आव्हान देखील केले यावेळी कडेगाव तालुका प्रमुख प्रदीप कदम म्हणाले की पलूस तालुक्यात प्रचंड प्रमाणात नागरिकांना प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून लुटले जात आहे. इथले महसूल खाते हे शासनाच्या महसुलासाठी नसून भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या वसुलीसाठी आहे अनेक नागरिकांचे पीएम किसान योजनेचे पैसे खात्यावर येत नाहीत यासाठी देखील तहसील प्रशासन कोणतेही ठोस पाऊल उचलत नाही म्हणून आंदोलनरुपी पवित्र घेतलेल्या आमचे सहकारी तालुकाप्रमुख प्रशांत लेंगरे यांना खोट्या केसेस ची धमकी  द्याल तर त्यास जशाच तसे शिवसेना स्टाईल ने उत्तर देऊ. आणि अवैध उत्खनन बंद नाही झाले तर जिल्हाप्रमुख आनंदराव बापू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन शिवसेना स्टाईलने पुन्हा केले जाईल. 


यावेळी संतापलेल्या शिवसैनिकानी तहसीलदार ढाणे यांना घेराव घातला. तालुकाप्रमुख प्रशांत लेंगरे , तालुकाप्रमुख प्रदीप कदम , युवा सेनेचे जिल्हा अध्यक्ष आकाश माने , सुरज सुर्वे , प्रवीण गलांडे , सागर कांबळे , प्रवीण टकले , श्रीकांत लेंगरे , अक्षय गायकवाड , जगदीश पवार , सुरज गोरड , दैवत दिवाण , घनश्याम सूर्यवंशी , विशाल शिंदे , प्रथमेश वाटेगावकर , राजू पोळ , सौरभ जाधव , जिल्हा संघटिका रुक्मिणी ताई आंबिगिरी , उपसंघटिका अंजली खांडेकर , हसीना मुल्ला , मोनेरा शेख , रंजना पाटील , पुनम जाजू , जयश्री थोरात , प्रज्ञा वाळके , शिवसेना युवासेना महिला आघाडी व कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने उपस्थित होते..

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆