yuva MAharashtra सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ताबडतोब उपाययोजना राबवाव्यात. .............वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांची जिल्हा अधिकारी सांगली यांच्या मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी...

सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ताबडतोब उपाययोजना राबवाव्यात. .............वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांची जिल्हा अधिकारी सांगली यांच्या मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी...




=====================================
=====================================

सांगली : वार्ताहर दि. २० जून २०२३

सांगली : मुंबईतल्या वसतिगृह मधील उच्च शिक्षित विद्यार्थिनीवर नराधमाने अतिप्रसंग करून तिचा निर्घृण हत्या केली आहे. या निर्दयी प्रवृत्ती पार्श्वभूमीचा विचार करून सरकारांची जबाबदारी म्हणून, महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्याबरोबरच सर्व जिल्ह्यांतील शासकीय, निमशासकीय, खाजगी शैक्षणिक संस्थांचे व वसतिगृहाचे समितीची स्थापना करून पुनःपरीक्षण (ऑडिट) करून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नियंत्रण ठेवण्यासाठी ताबडतोब उपाययोजना राबवाव्यात त्याचबरोबर सर्व महाविद्यालय आवारात मुलींची छेडछाड करणाऱ्या टवाळकी टोळीवर "पोस्को" कायदेअंतर्गत कारवाई करून तसेच "निर्भया पथक" यांच्या माध्यमातून संबंधित टोळक्याचा बंदोबस्त करा. या संदर्भात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्या वतीने मा. जिल्हाधिकारी सो, सांगली यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री सो तसेच मा गृहमंत्री सो महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी दिली

  आद.ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मा.संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मार्फत मा. जिल्हाधिकारी सो सांगली यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री सो तसेच गृहमंत्री सो यांना लेखी निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे की, दिनांक ५ जुन २०२३ रोजी रात्री माता सावित्रीबाई फुले वसतीगृह मुंबई येथे उच्च शिक्षणासाठी राहत असणारी युवती हिना मेश्राम हिच्यावर वसतिगृहात काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्याने तिच्यावर बलात्कार करून हत्या केली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी निंदनीय घटना घडली आहे. या निंदनीय घटनेचा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करत आहे.  हि निर्दयी घटना ताजी असतानाच मुंबई मध्ये चालत्या रेल्वेत महाविद्यालयीन युवतीवर एका नराधमाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. लैंगिक अत्याचार केला आहे. आणखी एकदा महाराष्ट्र राज्यातील मुलींची तसेच महिलांचा सुरक्षाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईत धावत्या  लोकलमध्ये एका महाविद्यालयीन युवतीवर झालेला अत्याचार संताप आणणारा आहे. महाराष्ट्र राज्यात  प्रशासन, गृहखाते, पोलीस प्रशासन या नावाची काही यंत्रणा जिवंत आहे की....नाही...? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जागतिक दर्जाचे शहर आहेआहे आणि कायद्याचा धाक नसल्या मुळे अशी भयानक घटना घडली आहे व भविष्यात घडण्याची शक्यता आहे. या मुळे सर्व समाजात संतापाची लाट निर्माण झाली आहे. व पालक भितीपोटी आपल्या मुलींना उच्च शिक्षणासाठी इतर ठिकाणी पाठविणार नाहीत, यामुळे पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात मुलींची सुरक्षा धोक्यात आली आहे.


 " बेटी बचाव और बेटी पडावं " हा उपक्रम फक्त कागदावरच राहिलेले दिसून येत आहे. 
महाराष्ट्रातील संवेदनशील 
 जिल्ह्यात निष्पाप लोकांचा बळी गेलेचे दिसत आहे. आज महाराष्ट्रात उच्च शिक्षित मुली तसेच महिला ही सुरक्षित नाहीत,मुंबई सारख्या मोठ्या शहरात उच्च शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या मुलीवर व महिलेवर अत्याचार होत आहेत या व्यवस्थेचे बळी पडले जात आहेत. संपूर्णपणे पोलिस व शासकीय यंत्रणा अपयशी ठरली आहे. तसेच सांगलीमध्ये मिरज शहरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा गळा चिरून खून करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना ताजी असतानाच तुंग या गावात बालिकेवर अतिप्रसंग करणेचा प्रयत्न लिंग पिसाट नराधमाने केला. प्रसंगावधान राखून त्या बहाद्दूर मुलीने आरडा-ओरड केली व त्याच्या तावडीतुन सुटका करून घेतल्याने ती बचावली अन्यथा ही बाब जीवघेणी ठरली असती. या 
प्रकरणी मुलीच्या आईने तात्काळ सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून संबंधित आरोपीला अटक करणेत आली आहे, या निर्दयी प्रवृत्ती मुळे सर्वसामान्य माणूस त्रासलेल्या अवस्थेत आहे. पोलीस प्रशासना वरील विश्वास दिवसेंदिवस ढळत चालला आहे. श्रमिक,कष्टकरी,मोलमजुरी करणारे कामगार तसेच ग्रामीण भागातील मध्यम वर्गीय लोक आपली मुलगी चांगल्या दर्जाचे उच्च शिक्षण घेऊन भारत देशाचे नाव उज्ज्वल करावे    हा दृष्टीकोन मनाशी घेऊन जिल्ह्याच्या शहराच्या ठिकाणी शैक्षणिक, व्यवसाय व वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेत आहेत. परंतु मुलींची मोठ मोठ्या शहरात सुरक्षित रहाण्याची सोय म्हणावे तसे होताना दिसत नाही. परंतु मुलींना शिक्षण पूर्ण करणे महत्त्वाचे असल्याचे मिळेल त्या ठिकाणी असेल त्या परिस्थितीत उपलब्ध होईल त्या ठिकाणी राहावे लागते आहे. काही शासकीय व निमशासकीय तसेच खाजगी वसतीगृह हे महाविद्यालया पासून १० ते १५ किलोमीटर अंतरावर असते अशा वेळी महाविद्यालयास पोहोचण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागतोय. या बाबतीत किमान शासकीय व निमशासकीय वसतीगृहात राहत असणारे शैक्षणिक मुलींची महाविद्यालया पर्यंत वेळेत व सुरक्षित पोहचण्यासाठी बस ची सोय करावी, कारण त्यांना अडचणीचा सामना करावा लागणार नाही. रस्त्यावर व चौका चौकात व्यसनी निर्दयी,टपोरे, टिंगलटवाळी करीत छेड काढत असतात. तसेच काही महाविद्यालय आवारात देखील अशा टवाळक्याचे मोठे वावर वाढले आहे. आशा टपोरी टिंगलटवाळी करीत असणारे टोळक्याच्यावर पोस्को कायदेअंतर्गत तसेच निर्भया पथक यांच्या माध्यमातून कडक कारवाई करून त्या  टोळक्याचा बंदोबस्त करावा, कारण शिक्षण घेत असलेल्या युवतींना मोकळा श्वास घेणे मुश्किल झाले आहे. आशा परिस्थितीत आईवडीलांना आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी काळजावर दगड ठेवून शहराच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी पाठवावे लागते. तरी या संपूर्ण प्रकरणाची आपण दखल घेऊन महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याबरोबरच सर्व जिल्ह्यांत मा. जिल्हाधिकारी सो यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासन तसेच समाज कल्याण विभाग व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग आणि जिल्हा पोलीस प्रशासन या सर्व विभागातील जबाबदार अधिकारी यांची समिती स्थापन करून, जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय तसेच विविध शैक्षणिक संस्थांचे वस्तीगृह त्याचबरोबर खाजगी रूम यांची महिन्यातून एकदा तपासणी करून सदर वसतीगृहात अथवा खासगी रूममध्ये राहत असणारे मुलींची शैक्षणिक सोय व व्यवस्था तसेच सुरक्षा आणि त्यांना दिले जाणारे भोजन आहार हा चांगला प्रमाणात सकस आहार दिला जातो का? रूमचे भाडे, पुरवल्या जात असलेल्या सुविधा, तसेच सदरचे ठिकाण हे मुलींच्या   शैक्षणिक दृष्ट्या योग्य सुरक्षित आहे का यांची पडताळणी करणे व नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता शासकीय व निमशासकीय वस्तीगृह किंवा एखादी संस्था अथवा खासगी रूमचे मालक दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आल्यास सदर जबाबदार अधिकारी, व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. तसेच शिक्षण घेण्यासाठी राहत असणाऱ्या मुलींची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाच्या खर्चाने सर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी. 
हि नम्र पणे विनंती करीत आहोत. तरी वरील प्रमाणे मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन तत्काळ समितीची स्थापना सर्वजण शासकीय व निमशासकीय तसेच खासगी वसतीगृह त्याचंबरोबर खाजगी मालकाचे रूम यांचे ऑडिट करण्यात यावे.  अन्यथा आद.ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी व होणाऱ्या नुकसानीला महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासन जबाबदार राहणार आहे. असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 



यावेळी, 
      वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मा.संजय संपत कांबळे, जिल्हा महासचिव मा.अनिलजी मोरे सर, जिल्हा संपर्कप्रमुख मा. संजय भूपाल कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष मा.सिध्दार्थ कांबळे, जिल्हा कोषाध्यक्ष मा.हिरामण भगत, मिरज तालुका अध्यक्ष मा. इसाक सुतार, मिरज शहर अध्यक्ष मा. असलम मुल्ला, जावेद आलासे, सुभाष पाटील, संगाप्पा शिंदे, बंदेनवाज राजरतन, प्रदिप मरचंद  संतोष वाघमारे, अनिल पवार, अलतप शरिकमसलत, जबीर चमडेवाले, समर्थ साठे यांच्या बरोबर बहुसंख्येने कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆