=====================================
=====================================
भिलवडी : वार्ताहर दि. ०९ जून २०२३
भिलवडी (ता.पलूस) : भिलवडी शिक्षण संस्थेने सेवाभावी वृत्तीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले.गेल्या ७४ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांच्या पिढ्या निर्माण करून कृष्णाकाठी शैक्षणिक क्रांती केली असल्याचे प्रतिपादन भिलवडी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त नानासाहेब चितळे यांनी केले.
९ जून १९४९ रोजी भिलवडी व कृष्णाकाठच्या परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या भिलवडी शिक्षण संस्थेने ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले.यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
भिलवडी शिक्षण संस्थेचा स्थापनादिन संस्था कार्यालय व संस्थेच्या संकुलात उत्साहमय वातावरणात संपन्न झाला. संस्थेच्या मूळ इमारतीच्या ठिकाणी संस्थेचे विश्वस्त व भिलवडी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष नानासाहेब चितळे व सौ.पद्मजा चितळे यांच्या हस्ते कोनशिलेला पुष्पहार घालून व श्रीफळ वाढवून अमृत महोत्सवी वर्षास करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
भिलवडी शिक्षण संस्थेने निर्माण केलेली गुणवत्तेची परंपरा सातत्याने टिकवून ठेवत भविष्यात येणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये टिकणारा विद्यार्थी घडविण्यासाठी सर्व पदाधिकारी,शिक्षक,सेवक वर्ग कटिबध्द असल्याचे मनोगत सचिव मानसिंग हाके यांनी व्यक्त केले.
मानसिंग हाके यांनी संस्थेस ७५०० रुपयाची देणगी दिली.यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक संजय कदम, सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडीचे मुख्याध्यापक संजय मोरे,सहसचिव के.डी.पाटील,प्रा.सौ.मनिषा पाटील,सुकुमार किणीकर,विद्या टोणपे,सुचेता कुलकर्णी,स्मिता माने आदींसह सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
भिलवडी शिक्षण संकुलात वृक्षारोपण प्रसंगी विश्वास चितळे,संजय कदम,मानसिंग हाके,के.डी.पाटील,संजय मोरे आदींसह मान्यवर.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆