=====================================
=====================================
भिलवडी (ता.पलूस) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रेटयामुळे फक्त सांगली जिल्ह्यातील जाहीर केलेला अन्यायकारक उपसा बंदी निर्णय आज सांगली पाटबंधारे विभागाला मागे घ्यावा लागला. शेतकऱ्यांच्या जीवनावश्यक दैनंदिन गरजेच्या प्रश्नावर स्वतः राजू शेट्टी साहेब या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे प्रशासनाला घेतलेला उपसा बंदीचा निर्णय मागे घ्यावा लागल्यामुळे
पलूस तालुक्यातील भिलवडी व परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने माननीय राजू शेट्टी साहेब यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले. यावेळी
सांगली जिल्हा कार्याध्यक्ष संदिप राजोबा , अधिकराव पाटील , भिलवडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शहाजी गुरव , उमेश निकम , विजय पाटील , जगन्नाथ शेटे आदी शेतकरी उपस्थित होते.
मा. राजू शेट्टी साहेब यांचा सत्कार करताना संदिप राजोबा , अधिकराव पाटील , शहाजी गुरव , उमेश निकम , विजय पाटील , जगन्नाथ शेटे आदि.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆