yuva MAharashtra भविष्यात कसलीही अडचण आली तर, एक कुटुंब म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत : आमदार अरुण (अण्णा) लाड

भविष्यात कसलीही अडचण आली तर, एक कुटुंब म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत : आमदार अरुण (अण्णा) लाड



=====================================
=====================================

 कुंडल : वार्ताहर          दि.२९ जून २०२३

 क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या मयत सभासदाची वारस पत्नी सुजाता दत्तात्रय कचरे यांना एक लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश कारखान्याचे अध्यक्ष आमदार अरुण लाड यांच्या हस्ते सुपुर्द केला. यावेळी गटनेते शरद लाड प्रमुख उपस्थित होते.
यावेळी आमदार लाड म्हणले, पलूस येथील कारखान्याचे सभासद दत्तात्रय रामचंद्र कचरे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या जाण्याने त्यांची कुटुंबातील पोकळी कोणीच भरून काढू शकत नाही. 
 सभासद म्हणजे कारखान्याचा कणा आहे. म्हणून, त्यांच्या कुटुंबाला सावरण्यासाठी आम्ही सर्व सभासदांचा विमा उतरवला आहे. यामुळे त्या कुटुंबाला आर्थिक मदत केली जातेच शिवाय भविष्यात कसलीही अडचण आली तर, एक कुटुंब म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी राहतो.

यावेळी उमेश जोशी, ऍड.सतीश चौगुले, कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे, जयप्रकाश साळुंखे, आप्पासाहेब कोरे उपस्थित होते.

क्रांतीच्या मयत सभासदांच्या वारसांना मदतीचा धनादेश देताना कारखान्याचे अध्यक्ष आमदार अरुणअण्णा लाड आणि मान्यवर
.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆