yuva MAharashtra सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी च्या मुख्याध्यापक पदी संजय मोरे यांची निवड

सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी च्या मुख्याध्यापक पदी संजय मोरे यांची निवड



=====================================
=====================================

भिलवडी प्रतिनिधी : दि. ०४ जून २०२३
 
भिलवडी (ता.पलूस) :- भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँण्ड  ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापकपदी सेवा जेष्ठतेनुसार संजय मोरे यांची मुख्याध्यापकपदी , विजय तेली यांची उपमुख्याध्यापक पदी व विनोद सावंत यांची पर्यवेक्षक पदी निवड करण्यात आली. 


शासकीय नियत वयोमानानुसार  शाळेचे मुख्याध्यापक संजय कुलकर्णी हे दिनांक 31 मे 2023 रोजी सेवानिवृत्त झाले त्यांच्या जागी सेवा जेष्ठतेने मुख्याध्यापक म्हणून संजय मोरे यांनी पदभार स्वीकारला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष  विश्वास चितळे, उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब चोपडे, सचिव मानसिंग हाके यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. तसेच  उपमुख्याध्यापक म्हणून सेवाजेष्ठतेने  विजय तेली व पर्यवेक्षक विनोद सावंत यांनाही निवडीचे पत्र देण्यात आले. संजय मोरे हे गेले 30 वर्षे अध्यापनाचे काम करत आहेत. इतिहास व मराठी हे विषय ते शिकवतात. याशिवाय जिल्हा व राज्यस्तरीय शिक्षकांना मार्गदर्शन, व्याख्याते म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांच्या या निवडीने पंचक्रोशीत त्यांचे अभिनंदन होत आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆