येळावी , नेहरूनगर व निमणी ग्रामपंचायतीच्या रस्ता रोको आदोलनाला यश..
व्हिडीओ
👇
==============================
==============================
--------------------------------------------------------------------
तासगाव : दि. १६ जून २०२३
(कार्यकारी संपादक - सचिन टकले)
--------------------------------------------------------------------
तासगांव : विजापूर गुहागर महामार्ग वरील पाचवा मैल ते येळावी फाटा व निमणी नेहरू नगर जवळील रखडलेले रस्त्याचे काम त्वरित चालू करण्यासाठी येळावी, निमणी ,नेहरू नगर ,येथील ग्रामस्थांच्या वतीने पाचवा मैल येथे रस्ता रोको करण्यात आले.या आधी तासगांव चे तहसीलदार रविंद्र राजने साहेबाना निवेदन देण्यात आले होते.त्या अनुषगाने हे आंदोलन करण्यात आले होते जवळपास एक तास चारही बाजूचा रस्ता बंद ठेवल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुक खोळंबली होती.वाहन चालकानी संबंधित रस्त्यासाठी रस्ता रोको होत असल्याने समाधान व्यक्त केले.तर काही वाहन चालकाने आपली व्यथा व्यक्त केली.
महामार्गाचे उप विभागीय अभियंता पी डी शेडेकर , व अभियंता पी ए राजपूत यांनी 8 दिवसात काम पूर्ण करून देऊ असे सांगितले आहे.
सबंधित रस्ता रोको ला यश आले असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी येथील विशाल दादा पाटील सरपंच आशाताई पिसाळ ,वैभव पाटील, दशरथ गावडे , उत्तम जानकर, रवी सूर्यवंशी, तसेच नेहरूनगर येथील सरपंच रामदास जाधव , जालिंदर मस्के ,अतुल पाटील, विजय कोळी तर तसेच निमणी येथील आर डी आप्पा पाटील ,निखिल गायकवाड ,डॉक्टर दीपक पाटील विशाल काकडे ,अविनाश पाटील, तसेच मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व तरुण वर्ग उपस्थित होता.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆