yuva MAharashtra सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेज, भिलवडीचे दहावी परीक्षेत उत्तुंग यश,

सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेज, भिलवडीचे दहावी परीक्षेत उत्तुंग यश,

             विद्यालयाचा निकाल ९७.६३टक्के

=====================================
=====================================

भिलवडी प्रतिनिधी : दि. ०४ जून २०२३

  भिलवडी (ता.पलूस)    :      येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज   भिलवडीच्या विद्यार्थ्यांनी  उत्तुंग यश संपादन केले.  मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा शाळेचा निकाल ९७.६३ टक्के लागला. शाळेत व सर्वसाधारण विभागात कु. साक्षी अधिकराव कुर्लेकर हिने ९९.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. कु. सृष्टी दादा चौगुले हिने ९८. ४० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक, तर कु. सुखदा धनंजय भोळे हिने ९७.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये कु. ऋतुजा संतोष कावरे हिने ९६.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक सौरभ वाघमारे याने ९०.६० टक्के गुण मिळवून तर कु. तन्वी वाघमारे हिने ८०.८८ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. याशिवाय विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी ६०, प्रथम श्रेणी प्राप्त विद्यार्थी ५०, द्वितीय श्रेणी प्राप्त विद्यार्थी ४६ व तृतीय श्रेणी प्राप्त विद्यार्थी ९ असे एकूण १६९ विद्यार्थ्यांपैकी १६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 


या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे, उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब चोपडे, सचिव मानसिंग हाके, सर्व संचालक, विश्वस्त, शाळेचे नवनिर्वाचित मुख्याध्यापक संजय मोरे उप मुख्याध्यापक  विजय तेली, पर्यवेक्षक विनोद सावंत सर्व शिक्षक बंधू-भगिनी यांनी अभिनंदन केले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆






◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆