======================================
======================================
भिलवडी : वार्ताहर दि.२० जून २०२३
भिलवडी (ता.पलूस) : कृष्णा वारणा नागरी बिगर शेती सहकारी पत संस्था जयसिंगपूर ची सन 2022-23 ते 2027-28 या कालावधीसाठी निवडणूक बिनविरोध झाली. बिनविरोध निवड झालेल्या संचालकांमधून श्री. प्रमोद भुपाल कवठेकर यांची चेअरमन पदी आणि श्री. तात्यासो आण्णाप्पा अंकलगे यांची व्हा. चेअरमन पदी निवड झाली यावेळी संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कवठेकर म्हणाले कृष्णा वारणा बिगर शेती पतसंस्थेच्या चेअरमनपदाची माझी निवड करून माझ्या जबाबदारीत वाढ केली आहे ह्या संस्थेच्या रूपाने गोरगरीब व गरजू लाभार्थ्यांना त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करेन शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करेन संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करण्याचा मानस आहे विविध उपक्रम राबविण्यात येतील अशी विविध कामे करण्याचा मानस प्रमोद कवठेकर यांनी व्यक्त केला.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बिनविरोध करण्यासाठी संस्थेचे संस्थापक चेअरमन माननीय श्री राजगोंडा पाटील माझी उपसभापती पंचायत समिती शिरोळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कृष्णा वारणा नागरी बिगर शेती पत संस्था जयसिंगपूर ची सन 2022-23 ते 2027-28 या कालावधीसाठीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. बिनविरोध निवड झालेले संचालक पुढील प्रमाणे राजगोंडा नेमगोंडा पाटील,प्रमोद भुपाल कवठेकर ,तात्यासो आण्णाप्पा अंकलगे, दादासो देवगोंडा पाटील,सुहास आण्णा पाटील,उल्लास रावसो पाटील, महावीर दादासो निटवे,सूर्यकांत राजाराम पाटील, शैलेश योसेफ तिवडे ,शरद सिद्धाप्पा पुजारी,राजेंद्र हणमंत सुतार, सौ. सोनल राजेंद्र घाटगे, सौ. सुरेखा बापुसो कोळी. यांची बिनविरोध संचालक म्हणून निवड झाली.
नुतन चेअरमन प्रमोद कवठेकर यांचा सत्कार करताना सर्व संचालक
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆