yuva MAharashtra युवा नेते ऋषी भैया टकले यांनी नुकसानग्रस्त मेंढपाळाची घेतली भेट..

युवा नेते ऋषी भैया टकले यांनी नुकसानग्रस्त मेंढपाळाची घेतली भेट..








=====================================
=====================================

भिलवडी : वार्ताहर             दि. १० जुलै २०२३

भिलवडी ( ता.पलूस ) : शनिवारी रात्री बुरुंगवडी ता.पलूस येथे अज्ञात हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध मेंढपाळ विठ्ठल पुजारी यांच्या 15 मेंढ्या ठार झाल्या होत्या. असमनी संकट ओढवलेल्या मेंढपाळाला युवा नेते  ऋषी भैया टकले यांनी प्रत्यक्ष भेटून  मदतीचा हात दिला. घडलेल्या संपूर्ण घटनेची माहिती घेवून संत्वानही केले, तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी संपर्क साधत संबंधित मेंढपाळाशी ही बोलणं करून दिलं. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार पडळकर यांनी तातडीने त्यांना मदत केली तसेच त्यांनी पलूसचे तहसीलदार यांच्याशी ही संपर्क साधला. 
ऋषी भैया यांनी वनविभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी  संपर्क साधत पंचचनामा करून योग्य ती मदत शासन स्तरावर करण्यासाठीही आग्रह धरला.
ऋषी भैया यांची गोरगरीब लोकांच्या बद्दल असणारी अस्था या प्रसंगातून दिसून आली.


यावेळी अमिर सलामत (भैय्या) , संदिप ऊर्फ पिटू मोटकट्टे 
डॉ. प्रताप नाईक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


  
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆