yuva MAharashtra क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी शरद लाड तर उपाध्यक्षपदी भगवंत पाटील यांची बिनविरोध निवड

क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी शरद लाड तर उपाध्यक्षपदी भगवंत पाटील यांची बिनविरोध निवड



====================================
====================================

कुंडल : वार्ताहर                 दि. ११ जुलै २०२३

क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी शरद लाड तर उपाध्यक्षपदी भगवंत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.एन.जाधव यांनी काम पाहिले.

                 शरद लाड, भगवंत पाटील.


परिसरात वाढते ऊस क्षेत्र आणि त्यातून शेतकऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळणेसाठी क्रांती कारखान्याची उभारणी क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापूंनी केली. अल्पावधीत हा कारखाना नावारूपाला आला कारण याची सर्व सूत्रे आमदार अरुणअण्णा लाड खंबीरपणे हाताळत होते. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम देत कारखान्याला सर्वोच्च स्थानावर नेऊन आजवर देशपातळीवरील अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे यामुळे सहकारातील एक नामांकित कारखाना म्हणून नावारूपाला आणल्याने शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरला आहे. आमदार अरुण लाड यांचे कामाच्या व्यापाचा विचार करता आमदार अरुणअण्णा लाड यांनी चिरंजीव शरद लाड यांना ही संधी दिली.


यावेळी संचालक दिलीप थोरबोले, अनिल पवार, जयप्रकाश साळुंखे, सुकुमार पाटील, वैभव पवार, ऍड सतीश चौगुले, संजय पवार, शीतल बिरनाळे, प्रभाकर माळी, अविनाश माळी, रामचंद्र देशमुख, जितेंद्र पाटील, संग्राम जाधव, बाळकृष्ण दिवानजी, अश्विनी पाटील, अंजना सूर्यवंशी, अशोक विभुते, सुभाष वडेर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.





क्रांती म्हणजे अरुणअण्णा असेच सूत्र आहे, अरुणअण्णांनी जो विश्वास टाकला त्याला कधीही तडा जाऊ देणार नाही, बापूंच्या नावलौकीकत भरच पडेल त्यासाठी जीवाचे रान करू....शरद लाड, अध्यक्ष क्रांती सहकारी साखर कारखाना.



खासगी कारखानदारी ही एकधिकारशाहीने चालवली जाते पण सहकाराने अनेक कुटुंबे उभा केली जातात, परंतु शासन सहकारावर सतत हल्ले करत आहे त्यातूनच मार्ग काढून सहकार वाढवा असे स्वर्गीय जी.डी.बापूंनी शिकवले. त्यांनी दाखवलेल्या वाटेवरूनच आपण प्रवास करत आहोत....आमदार अरुणअण्णा लाड
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆