कुंडल : वार्ताहर दि. ३० जुलै २०२३
क्रांती कामगार भजनी मंडळाने गट स्तरीय समरगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल सहभागी स्पर्धकांचे क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरदभाऊ लाड यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.
यावेळी शरद लाड म्हणाले, क्रांती कारखाण्याकडून महाराष्ट्रीय संस्कृती जपणाऱ्या कोणत्याही कलागुणांना नेहमी बळच दिले आहे. मग ते भजन असो व कुस्ती. यातून आपल्या राज्यातील कलांना प्रोत्साहन देऊन, देश पातळीवर झळकवणेस क्रांती उद्योग समूह नेहमी पुढाकार घेईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
ही गट स्तरीय समरगीत स्पर्धा कामगार कल्याण मंडळामार्फत सांगली येथे घेणेत आली होती. या स्पर्धेत निखिल मानुगडे, किरण चव्हाण, अधिक लाड, रमेश कोकळे, सुनील पाटील, शिवाजी माळी, सुभाष कुंभार, अशोक लाड, संतोष पाटील, स्वप्नील कोकळे, हरिदास कुंभार, सोमनाथ साळुंखे, राजेंद्र घोलप, सादिक चाऊस यांनी सहभाग घेतला होता.
क्रांती भजनी मंडळाची, नाशिक येथे 9 ऑगस्ट या क्रांती दिनानिमित्त होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रांती भजनी मंडळाने गट स्तरीय समरगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन करताना क्रांतीचे अध्यक्ष शरदभाऊ लाड, कार्यकारी संचालक सी.एस.गव्हाणे
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆