=====================================
भिलवडी : वार्ताहर दि.२६ जुलै २०२३
1999 मध्ये कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी भिलवडी येथे आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो.
युद्धादरम्यान, भारतीय लष्कराने पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावले आणि "ऑपरेशन विजय" चा भाग म्हणून टायगर हिल आणि इतर सर्व चौक्यांवर कब्जा करण्यात भारतीय सैनिकांनी यश मिळवले होते. लडाखच्या कारगिलमध्ये 60 दिवसांहून अधिक काळ भारत विरुद्ध पाकिस्तान युद्ध सुरु राहिले आणि शेवटी या लढाईत भारताने युद्ध जिंकले. दरवर्षी प्रमाणे आज देखील कारगील युद्धात शहीद झालेल्या शेकडो भारतीय जवानांना आजी-माजी सैनिक संघटना भिलवडी यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष कुमारबापू पाटील उपाध्यक्ष कयुम पठाण आणि भिलवडी पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक नितीन सावंत , मंडल अधिकारी सुरेखा जाधव , तलाठी जायभाये , ग्रामविकास अधिकारी कैलास केदारी यांच्या हस्ते अमर जवान ज्योतीला पुष्पहार अर्पण करुन शहिद जवानांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत कांबळे , सामाजिक कार्यकर्ते राहूल कांबळे , अब्बुबखर फकीर , आजी-माजी सैनिक संघटनेतील पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष कुमारबापू पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
दरम्यान ;
आजी माजी सैनिक संघटना भिलवडी यांच्या वतीने कारगिल विजय दिनानिमित्त अध्यक्ष कुमार बापू पाटील व उपाध्यक्ष कय्युम पठाण व संचालक मंडळ यांच्या हस्ते संघटनेच्या गावरान जागेत 10 झाडे लावण्यात आली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष-कुमार बापू पाटील , उपाध्यक्ष-कयुम पठाण , खजिनदार- उत्तम भोई , कार्यकारी उपाध्यक्ष-मारुती यादव, सदस्य रामचंद्र माळी , सलीम मुल्ला , दौलत जाधव , सुदाम देवार्डे , मुबारक पठाण उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆