=====================================
कुंडल : वार्ताहर दि. २६ जुलै २०२३
शुगर टेक्नॉलॉजीस्टस असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने साखर कारखानदारीतील योगदानाबद्दल दिला जाणारा प्रतिष्ठेचा " जीवन गौरव पुरस्कार" क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार अरुणअण्णा लाड यांना जाहीर झाला असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक सी.एस.गव्हाणे यांनी दिली.
ते म्हणाले, हा पुरस्कार देश पातळीवरून निवडण्यात येत असल्याने याचे एक वेगळेच स्थान साखर कारखानदारीत आहे. हा पुरस्कार देण्यासाठी काही निकष अभ्यासले जातात ते म्हणजे, क्रांती कारखान्याने सुरुवातीला केवळ अडीच हजार मेट्रिक टन प्रतिदिन गाळप क्षमतेने सुरुवात करून आजरोजी अगदी कमी कालावधीत नावलौकिक प्राप्त केला आहे. आजरोजी त्याची क्षमता नऊ हजार मेट्रिक टन प्रती दिन एवढी केली आहे. तसेच कारखान्याने देशापुढील वीजेचा तुटवडा लक्षात घेऊन राष्ट्रीय काम म्हणून 19.70 मेगा वॅट को जनरेशन प्रकल्पाची उभारणी केली आणि पूर्ण क्षमतेने आजवर चालवला आहे. शेतकऱ्यांना फक्त साखरेतून दर देणे शक्य नसल्याने उपपदार्थ निर्मिती महत्वाची असल्याचे लक्षात घेऊन, इथेनॉल प्रकल्पाची उभारणी करून आजरोजी 60 हजार लिटर प्रति दिन क्षमतेचा आसवनी व इथेनॉल प्रकल्प सुरू केला आणि तो यशस्वीरीत्या चालवला जात आहे. तसेच पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी 70 हजार वृक्ष लागवड व संवर्धन करून पर्यावरण बचावासाठीचा एक सामाजिक उपक्रम राबवून साखर कारखानदारीत एक आदर्श निर्माण केला आहे. याशिवाय ऊस क्षेत्र वाढून शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढावे म्हणून निरनिराळ्या ऊस विकास योजना तत्परतेने आखल्या आणि बेभान होऊन राबविल्या या योजनांतून शेतकऱ्याच्या आणि त्या अनुषंगाने कारखान्याच्या विकासात भरीव वाढ झाली आहे. या सर्व बाबिंचा विचार करून केंद्र व राज्य शासनाने देशातील सर्वोकृष्ट कारखाना म्हणून पुरस्कार ही देण्यात आला आहे या सर्व बाबींचा विचार करून, साखर कारखानदारीतील भरीव योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहिर करणेत आला आहे.
सदर पुरस्कार हा 6 सप्टेंबर 2023 रोजी केरळ येथील थीरूअनंतपुरम येथे होणाऱ्या अंतरराष्ट्रीय चर्चासत्र व शुगर एक्स्पो मध्ये दिला जाणार आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆